Steve Smith & Sachin Tendulkar & Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: सचिनचा 'हा' रेकॉर्ड 10 वर्षांनंतर मोडणार; कोहली अन् स्मिथपैकी...

IND vs AUS: या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये एकतर्फी विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

Manish Jadhav

IND vs AUS Border Gavaskar Trophy: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळत आहे.

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये एकतर्फी विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने 9 गडी राखून विजय मिळवला.

आता, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी भारतीय संघाला मालिकेतील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल.

त्याचबरोबर, या सामन्यात क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) एक विक्रमही मोडला जाऊ शकतो.

सचिनचा विक्रम मोडीत निघू शकतो

महान फलंदाज सचिन तेंडुलकर सर्वाधिक शतकांच्या बाबतीत जगभरातील फलंदाजांपेक्षा खूप पुढे आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही असेच आहे.

या प्रसिद्ध मालिकेत सचिनची एकूण 9 शतके आहेत आणि तो दोन्ही संघांच्या प्रत्येक फलंदाजापेक्षा पुढे आहे. पण अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याचा विक्रम मोडला जाऊ शकतो.

कोहली-स्मिथ शर्यतीत

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सचिनचा विक्रम मोडण्याच्या सर्वात जवळ ऑस्ट्रेलियाचा (Australia) स्टार क्रिकेटर स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली आहेत. या मालिकेतील सर्वाधिक शतकांच्या बाबतीत सचिननंतर स्टीव्ह स्मिथचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

स्मिथची भारताविरुद्ध एकूण 8 कसोटी शतके आहेत. अहमदाबाद कसोटीत आणखी एक शतक ठोकल्यास तो सचिनची बरोबरी करेल.

दुसरीकडे, जर त्याने दोन्ही डावात शतके झळकावली तर तो सचिनला मागे सोडू शकतो. मात्र, स्मिथचा सध्याचा फॉर्म पाहता ते खूप कठीण वाटत आहे.

कोहलीसाठी ते कठीण होईल

दुसरीकडे, विराट कोहलीबद्दल बोलायचे झाल्यास, अहमदाबाद कसोटीत हा विक्रम मोडणे त्याच्यासाठी शक्य नाही. त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 7 शतके आहेत. अहमदाबाद कसोटीच्या दोन्ही डावांत कोहलीने शतक झळकावले तर तो तेंडुलकरची बरोबरी करु शकेल.

त्याचबरोबर, या मालिकेत विराटचा फॉर्म खूपच खराब राहिला आहे. शतक तर दूरच, विराटला या मालिकेत अर्धशतकही करता आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अर्जुन तेंडुलकरविरुद्ध वैभवनं आक्रमक फलंदाजी केली, पण बिहार हरला; धमाकेदार सामन्यात गोव्याने नोंदवला शानदार विजय!

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग कधी होणार पूर्ण होणार? नितीन गडकरींनी संसदेत केली मोठी घोषणा; कोकणवासीयांचा वनवास संपणार!

Goa Drug Bust: शिवोलीतील फुटबॉल मैदानाजवळ 7.90 लाखांचं ड्रग्ज जप्त, रत्नागिरीच्या 25 वर्षीय तरुणाला अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई!

'ऑलिम्पिकसाठी गोव्याला सज्ज करा'! रॅकेट खेळांसाठी 'उत्कृष्टता केंद्र' स्थापन करण्याची खासदार तानावडेंची राज्यसभेत मागणी

IndiGo Share Market Loss: विमानं रद्द करणं इंडिगोला पडलं महागात! एका दिवसात तब्बल 7160 कोटींचा फटका, बाजारमूल्यात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT