King Kohli and KL Rahul. Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs AUS: विराट-राहुलचं चेपॉकवर 'तूफान', कांगारुंवर सलामीलाच पराभवाची नामुष्की

ODI World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारताने विजयी सुरुवात केली आहे.

Manish Jadhav

ODI World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारताने विजयी सुरुवात केली आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रविवारी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेट्सने विजय नोंदवला.

ऑस्ट्रेलियाने 200 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात 41.2 षटकांत पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही.

भारताने (India) अवघ्या 2 धावांत तीन विकेट गमावल्या. इशान किशनला पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कने बाद केले.

त्याचवेळी, जोश हेजलवुडने दुसऱ्याच षटकात कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला आऊट केले. तिन्ही खेळाडू शून्यावर बाद झाले.

अशा परिस्थितीत विराट कोहली आणि केएल राहुलने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भक्कम भागीदारी केली.

38व्या षटकात कोहली हेझलवूडचा बळी ठरला. त्याने 116 चेंडूत 6 चौकारांसह 85 धावांची खेळी केली. राहुलने 115 चेंडूत 97 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले.

विराट आणि राहुलचे शतक हुकले

विराट कोहली 85 धावा करुन बाद झाला. डावाच्या 38व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तो मार्नस लॅब्युशेनकरवी झेलबाद झाला. विराटने 116 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार लगावले.

तर राहुलने 115 चेंडूत 97 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. विराटनंतर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) फलंदाजीला आला. विराट आणि राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली.

कांगारु फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 49.3 षटकात सर्वबाद 199 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 46 धावा केल्या.

भारताकडून रवींद्र जडेजाने तीन तर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले.

जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला विराट कोहलीकरवी झेलबाद केले. 17व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला त्याच्याच चेंडूवर झेलबाद करुन पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. डेव्हिड वॉर्नर 41 धावा करुन बाद झाला.

रवींद्र जडेजाने 28व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथला बाद करुन ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. स्टीव्ह स्मिथ 46 धावा करुन बाद झाला.

रवींद्र जडेजाने 30 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मार्नस लॅब्युशेनला झेलबाद करुन ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. तर 30 व्या षटकात लॅब्युशेनला 27 धावांवर आणि ऍलेक्स कॅरेला शून्यावर माघारी धाडले.

यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मॅक्सवेलला 36 व्या षटकात कुलदीप यादवने 15 धावांवर त्रिफळाचीत केले. त्याच्या पुढच्याच षटकात ग्रीनला आर अश्विनने 8 धावांवर माघारी धाडले.

त्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने झुंज दिली. ते धावा जोडत असतानाच कमिन्सला 43 व्या षटकात 15 धावांवर जसप्रीत बुमराहने बाद केले. त्याचा शानदार झेल श्रेयस अय्यरने घेतला. पण यानंतरही झम्पाने 20 चेंडूत खेळत स्टार्कला साथ दिली होती.

पण अखेर 49 व्या षटकात 6 धावांवर झम्पाला हार्दिक पांड्याने विराट कोहलीच्या हातून झेलबाद केले. अखेरीस स्टार्कची विकेट शेवटच्या षटकात सिराजने घेतली. तो 28 धावांवर बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT