Australia Test Team Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात बनला 'हा' महारेकॉर्ड, 146 वर्षात पहिल्यांदाच...!

Border–Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.

Manish Jadhav

IND vs AUS 2nd Test Match: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत आहे.

कसोटी क्रिकेटची सुरुवात 1877 मध्ये झाली होती, पण या सामन्यात असे काही पाहायला मिळाले, जे याआधी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कधीच पाहिले गेले नव्हते.

हे दृश्य 146 वर्षात पहिल्यांदाच पाहायला मिळाले

पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला एक डाव आणि 132 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी शानदार कामगिरी केली.

अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या कसोटीत केवळ एका वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरला आहे. हा वेगवान गोलंदाज दुसरा कोणी नसून कॅप्टन पॅट कमिन्स आहे. 146 वर्षांच्या कसोटी इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ फक्त 1 वेगवान गोलंदाजासह सामना खेळत आहे.

प्लेइंग 11 मध्ये 4 फिरकीपटूंना स्थान मिळाले

दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात कर्णधार पॅट कमिन्सने प्लेइंग 11 मध्ये 4 फिरकीपटूंचा समावेश केला आहे. नॅथन लियॉन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनमन हे फिरकीपटू म्हणून संघाचा भाग बनले आहेत, तर ट्रॅव्हिस हेडही फिरकी गोलंदाजी करु शकतो.

मॅथ्यू कुहनेमनचा हा पहिलाच कसोटी सामना आहे. त्याला मिचेल स्वेपसनच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळाले आहे.

या गोलंदाजांना भारतीय संघात स्थान मिळाले

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin), रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा स्पिनर म्हणून टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाज म्हणून संघाचा भाग बनले आहेत.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11

डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (सी), टॉड मर्फी, नॅथन लियॉन, मॅथ्यू कुहनमन.

टीम इंडियाची प्लेइंग 11

रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind Vs SA: भारत की आफ्रिका! 'टॉस' ठरणार निर्णायक? महिला क्रिकेट टीम स्वप्नपूर्तीचा उंबरठ्यावर

Ponda: फोंडा पोटनिवडणुकीचा विषय 'दिल्ली'त! प्रदेशाध्यक्ष दामूंना पाचारण; उमेदवाराच्या नावावरून चर्चांना उधाण

Horoscope: अनपेक्षित घडामोडींसाठी तयार राहा, महत्वाच्या व्यक्तीशी भेट उपयोगी ठरेल; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

World Cup 2025 Final: क्रिकेटचं वेड! तिकिटाचा दर 1.3 लाखांहून अधिक, तरीही 'फायनल' पाहण्यासाठी चाहत्यांची मुंबईत तुफान गर्दी

गोवा झालं महाग! पर्यटनाच्या नावाखाली लूट, 'कचऱ्याचे ढिग' आणि 'टॅक्सीवाल्यांची दादागिरी', पर्यटकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

SCROLL FOR NEXT