Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: किंग कोहली ग्रेटच! या' खेळाडूंना मिळाली विराटची जर्सी, पाहा Video

IND vs AUS: किंग कोहलीने ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा आणि अॅलेक्स कॅरी यांना आपली जर्सी भेट दिली.

Manish Jadhav

IND vs AUS: अहमदाबाद कसोटीत विराट कोहलीने केवळ आपल्या बॅटनेच जलवा दाखवला नाही तर सामन्यानंतर त्याने असे काही केले की, लोक पुन्हा एकदा त्याचे कौतुक करु लागले आहेत. सामन्यानंतर विराटने ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंना आपली जर्सी भेट दिली.

ख्वाजा-कॅरीला विराटची जर्सी मिळाली

सामना संपल्यानंतर, प्रेजेंटेशन सेरेमनी झाली, ज्यामध्ये विराट कोहलीला त्याच्या शानदार शतकी खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

प्रेजेंटेशन सेरेमनीनंतर विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी संवाद साधताना दिसला, यादरम्यान किंग कोहलीने ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा आणि अॅलेक्स कॅरी यांना आपली जर्सी भेट दिली. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

विराटने जर्सीवर ऑटोग्राफ दिला

यादरम्यान विराट कोहलीने ख्वाजा आणि कॅरी यांना भेट दिलेल्या जर्सीवर स्वत:चा ऑटोग्राफही दिला. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विराट कोहलीचे ऑस्‍ट्रेलियाच्‍या खेळाडूंसोबतचे बॉन्डिंग वाखणण्याजोगे आहे, जे मॅचच्‍या वेळीही अनेकदा दिसले. विराटने आपले शतक पूर्ण केल्यावर ऑस्ट्रेलियाचा (Australia) कर्णधार स्टीव्ह स्मिथसह अनेक खेळाडूंनी टाळ्या वाजवून दाद दिली.

विराटने शानदार खेळी केली

अहमदाबाद कसोटीत विराट कोहली प्रदीर्घ काळानंतर फॉर्ममध्ये दिसला, त्याने तब्बल 3 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शानदार शतक झळकावले. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 186 धावांची शानदार शतकी खेळी खेळली. ज्यासाठी त्याची सामनावीर म्हणूनही निवड झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; विधानसभा विजयाबद्दल केले अभिनंदन

IFFI Goa 2024: "हा माहितीपट केवळ श्रद्धांजली नाही, मोहन रानडेंचे स्मारक व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे"; चित्रपट महोत्सवात उभा राहिला मुक्तिसंग्राम

77th Army Day संचलनाची IFFI मध्ये झलक! पुणे सांभाळणार यजमानपदाची धुरा

Goa Crime: महिलांसाठी गोवा नॉट सेफ? 11 महिन्‍यांत सात महिलांची हत्या; लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या 100 घटना

Indian Navy Goa: भारतीय नौदलाच्या पाणबुडीचा आणि मच्छीमार नौकेचा अपघात कसा झाला? महत्वाची माहिती समोर, दोघेजण अद्याप बेपत्ताच

SCROLL FOR NEXT