IND vs AUS: लायनची फिरकी भारतात ठरली भल्याभल्यांना भारी! 'या' रेकॉर्ड लिस्टमध्ये मिळवलंय अव्वल स्थान

Nathan Lyon: भारताविरुद्ध अहमदाबाद कसोटीत खेळताना ऑस्ट्रेलियन फिरकीपटू लायनने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Nathan Lyon
Nathan LyonDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कसोटी मालिकेतील चौथा सामना झाला. या सामन्यात खेळताना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायनने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात प्रमथ फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 480 धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात 571 धावा उभारत 91 धावांची आघाडी घेतली. दरम्यान पहिल्या डावात लायनने भारताच्या 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.

त्याने या डावात 128 धावांची शतकी खेळी करणाऱ्या शुभमन गिल, 44 धावांवर केएस भरत आणि आर अश्विन (7) यांच्या विकेट्स घेतल्या. याबरोबरच तो भारतामध्ये सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा परदेशी गोलंदाज ठरला आहे.

Nathan Lyon
IND vs AUS: अहमदाबाद कसोटीत घडला इतिहास! भारतीय फलंदाजांनी केला आजपर्यंत कधीही न घडलेला पराक्रम

लायनच्या नावावर भारतामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 11 सामन्यांतील 19 डावांमध्ये 27.35 च्या सरासरीने 56 विकेट्स आहेत. त्यामुळे त्याने भारतात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या परदेशी गोलंदाजांच्या यादीत डेरेक अंडरवूड यांना मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला आहे. इंग्लंडच्या अंडरवूड यांनी भारतात कसोटीमध्ये 54 विकेट्स घेतल्या होत्या.

भारतामध्ये सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे परदेशी गोलंदाज

56 विकेट्स - नॅथन लायन (11 सामने)

54 विकेट्स - डेरेक अंडरवूड (16 सामने)

52 विकेट्स - रिची बेनॉड (8 सामने)

43 विकेट्स - कर्टनी वॉल्श (7 सामने)

40 विकेट्स - मुथय्या मुरलीधरन (11 सामने)

Nathan Lyon
IND vs AUS: फक्त क्रिकेटमध्येच नाही, तर हॉकीतही टीम इंडिया ऑस्ट्रेलियावर भारी; मिळवला दणदणीत विजय

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स

लायन हा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज देखील आहे. त्याने आत्तापर्यंत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 116 विकेट्स घेतले आहेत. तसेच या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचा आर अश्विन असून त्याने आत्तापर्यंत 114 विकेट्स घेतल्या आहेत.

सामना अनिर्णित राहण्याची शक्यता

या सामन्यात भारताचा पहिला डाव 571 धावांवर संपल्यानंतर सामन्याच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसरे सत्र संपले, तेव्हा दुसऱ्या डावात 2 बाद 158 धावा केल्या होत्या. त्यामुळे अद्याप भारताचा संपूर्ण एक डाव बाकी असल्याने आणि ऑस्ट्रेलियाच्या 8 विकेट्स बाकी असल्याने हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com