Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: 6 वर्षांपासून टीम इंडिया चेन्नईमध्ये विजयाच्या प्रतिक्षेत!

IND vs AUS 3rd ODI Match: आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे.

Manish Jadhav

IND vs AUS 3rd ODI Match Chepauk Stadium Head To Head: आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना 22 मार्च रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. मालिकेतील दोन सामने झाले असून दोन्ही संघ प्रत्येकी एक सामना जिंकून बरोबरीवर आहेत.

दरम्यान, मालिका कोणता संघ काबीज करणार हे तिसऱ्या सामन्यातूनच ठरेल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने या वर्षात आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर आव्हान मोठे असेल.

पण आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या फलंदाजांची कामगिरी आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची ताकद पाहता हा विजय सोपा होणार नाही, असे दिसते.

विशेष म्हणजे, चेपॉक स्टेडियम गेल्या काही वर्षांत टीम इंडियासाठी फारसे अनुकूल राहिलेले नाही. टीम इंडिया गेली सहा वर्षे इथे विजयाच्या प्रतिक्षेत आहे, जी पूर्ण होत नाहीये.

चेन्नईच्या चेपॉकमध्ये सहा वर्षांपासून टीम इंडियाने एकही वनडे सामना जिंकलेला नाही. 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळण्यासाठी टीम इंडिया (Team India) शेवटचे चेपॉक स्टेडियमवर आली होती, पण त्या सामन्यात भारतीय संघाला आठ विकेट्सने दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

पण 2017 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आले होते, तेव्हा भारतीय संघाने विजय मिळवला होता, मात्र हा विजय केवळ 26 धावांनीच झाला होता.

तेव्हापासून एकही विजय मिळवता आलेला नाही. चेन्नईच्या या स्टेडियममध्ये भारतीय संघ आतापर्यंत 14 एकदिवसीय सामने खेळला आहे. यापैकी भारतीय संघाने सात सामने जिंकले असून उर्वरित सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

म्हणजेच, विजयाची टक्केवारी फक्त 50 टक्के आहे. जी पुरेशी चांगले म्हणता येणार नाही. दरम्यान, विशेष बाब म्हणजे या स्टेडियमवर पहिला वनडे सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. हे वर्ष 1987 होते आणि ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा एका धावेच्या किरकोळ फरकाने पराभव करुन विजय मिळवला होता.

टीम इंडियाच्या टॉप 3 पैकी एकाला मोठी इनिंग खेळावी लागणार

22 मार्च रोजी होणाऱ्या या सामन्याची खास गोष्ट म्हणजे रोहित शर्मा येथे प्रथमच वनडेमध्ये कर्णधार म्हणून खेळणार आहे. अ

शा परिस्थितीत सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत. रोहित शर्माने 2023 मध्ये एकही वनडे मालिका गमावलेली नाही.

प्रथम, टीम इंडियाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेचा लाजीरवाणा पराभव केला आणि त्यानंतर न्यूझीलंडचाही सफाया केला.

आता, दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ज्या प्रकारे पुनरागमन करत भारतीय संघाला थक्क केले आहे, त्यावरुन हा सामना सोपा होणार नसल्याचे दिसून येत आहे.

टीम इंडियाच्या विजयासाठी रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली या टॉप 3 मधील कोणत्याही एका फलंदाजाने मोठी खेळी करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim Beach: 'मोरजी किनाऱ्यावरील सुशोभीकरण थांबवा'! गोवा खंडपीठाचा आदेश; GTDC प्रकल्पाला खीळ

Career and Money Horoscope: करिअरमध्ये यश, पैशांत वाढ! वाचा दैनिक भविष्य; जाणून घ्या ग्रहांचे संकेत

Cutbona Jetty: 'माशे मेंळ्ळे ना'! समुद्र अजून खवळलेला, कुटबण जेटीवर मजूर परतले; ट्रॉलरमालकांची वाढली लगबग

Goa Assembly Live: जपान आणि अमेरिकेच्या काही भागात स्थलांतराचा इशारा

Illegal Liquor Goa: सासष्‍टीत सर्वाधिक बेकायदा दारू धंदा! 5 वर्षांत 1395 प्रकरणे नोंद; नव्‍याने 2365 परवाने

SCROLL FOR NEXT