Border Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेला या महिन्याच्या 9 तारखेपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकमेकांविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील.
तसेच, यावेळी दोन्ही संघ या मालिकेत अनेक विक्रम मोडू शकतात. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. आज या मालिकेत कोणते विक्रम मोडले जाऊ शकतात हे जाणून घेऊया...
या मालिकेत भारतासोबतच (India) ऑस्ट्रेलियन खेळाडूही अनेक विक्रम करु शकतात. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज स्टीव्ह स्मिथ 9000 कसोटी धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे. स्टीव्ह स्मिथकडे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9000 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 8647 धावा केल्या आहेत.
यासोबतच, स्टीव्ह स्मिथही कसोटी शतकांचा विक्रम करु शकतो. स्मिथने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 30 शतके झळकावली आहेत. आता त्याला बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेत सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आहे. या मालिकेत त्याने 9 शतके ठोकली आहेत, तर स्टीव्ह स्मिथने या मालिकेत 8 शतके झळकावली आहेत.
विकेट्सच्या बाबतीतही ही मालिका खूप खास असणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने 20 कसोटी सामन्यात 111 विकेट घेतल्या आहेत. आणि आता नॅथन लियॉन हा विक्रम मोडू शकतो. 22 कसोटीत त्याच्या नावावर 94 विकेट आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.