IND vs AUS: 'अजून एक...अजून एक... भारतात हे संपतच नाही', ख्वाजाने घेतली वॉर्नरची फिरकी; Video

चाहत्यांच्या गराड्यात अडकलेल्या वॉर्नरचा एक खास व्हिडिओ ख्वाजाने शेअर केला आहे.
David Warner with Fans
David Warner with FansDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या भारतीय दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दरम्यान, या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ नागपूरला पोहचले आहेत. दरम्यान, नागपूरला येतानाचा एक मजेशीर व्हिडिओ ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलियन संघ गेल्या काही दिवसांपासून अलूरमध्ये कसोटी मालिकेसाठी सराव करत होता. त्यानंतर 6 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया संघ बंगळुरूवरून नागपूरसाठी रवाना झाला. दरम्यान, यावेळी बंगळुरू विमानतळावर सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला चाहत्यांनी घेरले होते. त्यामुळे ख्वाजा त्याची मजा घेत होता.

David Warner with Fans
IND vs AUS: कसोटीतील शतकांचा दुष्काळ संपवणार विराट, जाणून घ्या नागपुरातील रेकॉर्ड

खरंतर भारतातील लोकप्रिय परदेशी खेळाडूंमध्ये वॉर्नरचीही गणना होते. वॉर्नरचे अनेक चाहते भारतात आहेत. ते त्याच्यावरील प्रेम अनेकदा व्यक्तही करत असतात. त्याच्या लोकप्रियतेचा प्रत्येय बंगळुरू विमानतळावरही आला.

झाले असे की बंगळुरू विमानतळावर ऑस्ट्रेलियन संघ आलेला असताना अनेक चाहत्यांनी वॉर्नरला घेरले होते, हे चाहते एक एक करून त्याच्याबरोबर फोटो घेत होते. ही घटना ख्वाजाने कॅमेरात टिपली आहे.

यावेळी तो 'ओह बॉय,अजून एक' असे म्हणत वॉर्नरची मजाही घेत आहे. तसेच चाहते वॉर्नरबरोबर फोटो काढत असताना अन्य ऑस्ट्रेलियन खेळाडूही त्याच्याकडे कुतुहलाने पाहात आहेत. हा व्हिडिओ ख्वाजाने सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की 'जेव्हा भारतात असता, तेव्हा अजून एक फोटो, हे सुरूच असते.'

(Usman Khawaja shared a funny video of David Warner who was mobbed by fans at the Bengaluru airport)

David Warner with Fans
IND vs AUS: रोहित-विराटची गळाभेट अन् टीम इंडियाचा नेटमध्ये जोरदार सराव, कसोटीच्या तयारीचा पाहा Video

याशिवाय वॉर्नरनेही चाहत्यांबरोबरचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, वॉर्नर भारतात यापूर्वीही अनेकदा खेळला असून तो आयपीएलमध्येही सध्या दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे. तसेच तो सनरायझर्स हैदराबाद संघाकडूनही खेळला आहे.

David Warner with Fans
David Warner with FansDainik Gomantak

दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाचे नागपूरला येण्यापूर्वी अलूरमध्ये चार दिवसांचे सराव शिबिर सुरू होते. या सराव शिबिरात ऑस्ट्रेलियाने फिरकी गोलंदाजीचा सामना कसा करायचा यावर भर दिलेला दिसला. यासाठी त्यांनी भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील गोलंदाजांची मदत घेतली होती.

पण, पहिल्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठे धक्के बसले आहेत. त्यांचे मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूड हे वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे पहिला कसोटी सामना खेळणार नाहीत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी)

9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी - पहिली कसोटी, नागपूर

17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी - दुसरी कसोटी, दिल्ली

1 मार्च ते 5 मार्च - तिसरी कसोटी, धरमशाला

9 मार्च ते 13 मार्च - चौथी कसोटी - अहमदाबाद

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com