Ind vs Aus | Suryakumar yadav  BCCI Twitter
क्रीडा

Ind vs Aus 1st ODI: पहिल्या वनडेत भारताची ऑस्ट्रेलियावर मात; चौघा भारतीयांनी झळकावली अर्धशतके

ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून मात

Akshay Nirmale

Ind vs Aus 1st ODI: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने देलेले 276 धावांचे आव्हान भारताने 48.4 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 8 चेंडू राखून 281 धावा करत पूर्ण केले. भारताकडून चार फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. कर्णधार के. एल. राहुलने नाबाद अर्धशतकी खेळी केली.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आज, शुक्रवारपासून सुरवात झाली. मोहालीतील बिंद्रा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामनात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 277 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीरांनी 142 धावांची सलामी दिली. ऋतुराज गायकवाडने 10 चौकारांसह 77 चेंडूत 71धावांची खेळी केली तर शुबमन गिल याने 63 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह 74 धावा केल्या.

त्यानंतर सूर्यकुमार यादवनेही अर्धशतक झळकावताना 50 धावांची खेळी केली तर कर्णधार के. एल. राहुल 58 धावांवर नाबाद राहिला. इशान किशन 18 आऊट झाला तर श्रेयस अय्यर 3 धावांवर धावबाद झाले. तर रविंद्र जडेजा 3 धावांवर नाबाद राहिला. तीन विकेट झटपट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि के. एल. राहुल यांनी डाव सावरला.

दोघांनी अर्धशतके झळकावत भारताला विजयापर्यंत नेले. पण, विजयासाठी 10 धावा बाकी असताना सूर्यकुमार आऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पा याने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स, सीन अबॉट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पुर्वी के. एल. राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 276 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मिशेल मार्शला मोहम्मद शमीने 4 धावांवर बाद केले. नंतर वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली.

वॉर्नर अर्धशतकानंतर लगेचच बाद झाला. त्याला रविंद्र जडेजाने शुभमन गिलकडे झेल देण्यास भाग पाडले. वॉर्नरने 53 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. त्यानंतर स्मिथने शेन लॅब्युशेनला साथीला घेत डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

पण स्थिरावलेल्या स्मिथला शमी 22 व्या षटकात त्रिफळाचीत केलं. स्मिथने 60 चेंडूत 41 धावा केल्या.

आर अश्विनने लॅब्युशेनला 39 धावांवर बाद केले. त्यानंतर अचानक पाऊस आल्याने काहीवेळासाठी सामना थांबला होता. त्यानंतर ग्रीन 31 धावांवर धावबाद झाला. स्टॉयनिसने 29 धावा करत ऑस्ट्रेलियाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. त्याला शमीने त्रिफळाचीत केले. तर इंग्लिस याला बुमराहने 45 धावांवर बाद केले.

भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर बुमराह, आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विवोने पुन्हा केला मोठा धमाका! दमदार बॅटरी, प्रोसेसरसह Vivo V60 5G लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि अफलातून फीचर्स

Cancer: महिलांनो सावधान! गर्भनिरोधक गोळ्या वाढवतायेत कॅन्सरचा धोका? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला अन् खबरदारीचे उपाय

AUS vs SA 2nd T20: दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर 'विराट' मात! मोडला आपलाच रेकॉर्ड; गोलंदाजांनी बजावली महत्त्वाची भूमिका

Viral Video: पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा जीवघेणा स्टंट, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकरी व्यक्त करतायेत संताप

Dewald Brevis Century: क्रिकेटचा नवा तारा, डेवाल्ड ब्रेव्हिसने टी-20 मध्ये शतक ठोकून रचला इतिहास, अनेक विक्रम मोडले

SCROLL FOR NEXT