World Cup 2023: नव्या-जुन्यांचा मेळ साधत पाकिस्तानने जाहिर केला संघ, नसीम शाह बाहेर, 'या' 15 जणांना संधी

World Cup 2023: भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर झाला आहे.
Pakistan Cricket Team
Pakistan Cricket TeamDainik Gomantak

Pakistan Team Announced for World Cup 2023:

भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी आता दोन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. अशात अनेक देशांनी आपला संघ घोषित केला आहे, आता गुरुवारी पाकिस्ताननेही त्यांचा 15 जणांचा संघ जाहीर केला आहे.

दरम्यान त्यांना या स्पर्धेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा युवा प्रतिभावान वेगवान गोलंदाज नसीम शाह वर्ल्डकप स्पर्धेला मुकणार आहे. त्याला आशिया चषक २०२३ स्पर्धेत खेळताना भारताविरुद्धच्या सुपर फोरच्या सामन्यात दुखापत झाली होती.

त्यामुळे आता त्याला आगामी काही आठवडे क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. त्याने गेल्या काही महिन्यात शानदार कामगिरी केली होती. मात्र, आता तो संघात नसल्याने पाकिस्तान संघासाठी हा मोठा धक्का आहे.

Pakistan Cricket Team
World Cup 2023 साठी टीम इंडियाच्या जर्सीत काय झाले बदल? BCCI ने शेअर केला व्हिडिओ

तथापि, वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पाकिस्तानच्या संघात हसन अली, शाहिन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ, मोहम्मद वासिम हे वेगवान गोलंदाज आहे. वर्ल्डकप 2023 मध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व बाबर आझम करणार आहे.

त्याला फलंदाजीत फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान, इफ्तिखर अहमद, सलमान अघा यांची साथ मिळेल. तसेच मोहम्मद हॅरिस आणि सौग शाकिल यांचाही संघात समावेश आहे.

याशिवाय शादाब खान आणि मोहम्मद नवाझ हे फिरकी गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. तसेच गरज पडल्यास सलमान अघा आणि इफ्तिखर अहमद हे दखील फिरकी गोलंदाजी करू शकतात, तर उस्मान मीरचाही पर्याय आहे.

Pakistan Cricket Team
Cricket World Cup 2023: गोव्याचे पंच सय्यद खलिद यांना मोठी संधी; वर्ल्डकपमध्ये 2 सामन्यांत करणार पंचगिरी

5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध हैदरबादला नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. त्यापूर्वी पाकिस्तानला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध सराव सामने खेळायचे आहेत.

  • पाकिस्तान संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्लाह शफिक, मोहम्मद रिझवान, सौद शकिल, इफ्तिखर अहमद, सलमान अली आघा, मोहम्मद नवाझ, उस्मान मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहिन आफ्रिदी, मोहम्मद वासिम.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com