IND vs AUS: शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मारला पंजा, कुंबळे-अगरकरला मागे टाकत रचले मोठे रेकॉर्ड्स

Mohammad Shami: मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडेत 5 विकेट्स घेत मोठे 3 विक्रम केले आहेत.
Mohammad Shami
Mohammad ShamiDainik Gomantak

Mohammad Shami 5 Wickets in India vs Australia 1st ODI:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मोहालीला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना झाला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 5 विकेट्स घेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात मोहम्मद शमीने 10 षटके गोलंदाजी करताना 51 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. याबरोबर त्याने अनेक दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. शमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत ५ विकेट्स घेणारा भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम कपिल देव आणि अजित अगरकर यांनी केला होता.

कपिल देव यांनी 1983 साली नॉटिंगघमला झालेल्या वनडेत 43 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर 2004 साली मेलबर्नला झालेल्या वनडेत अजित अगरकरने 42 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

Mohammad Shami
IND vs AUS: केएल राहुलने जिंकला टॉस! अश्विन, स्मिथ, कमिन्ससह दिग्गजाचे कमबॅक, पाहा 'प्लेइंग-11'

कुंबळे-श्रीनाथला टाकले मागे

शमीने वनडेत 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची ही 11 वी वेळ होती. त्यामुळे त्याने भारतासाठी सर्वाधिकवेळा वनडेत 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे.

यावेळी त्याने अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांना मागे टाकले आहे. कुंबळे आणि श्रीनाथ यांनी प्रत्येकी 10 वेळा वनडेत भारतासाठी 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर अजित अगरकर आहे. त्याने 12 वेळा 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

Mohammad Shami
W,0,W,W,4,W...! सिराजच्या वेगाने लंकेची दाणादाण, भारतीय क्रिकेट इतिहासात कोरलं सुवर्णाक्षरांनी नाव

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स

शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत देखील दुसऱ्या क्रमांक मिळवला आहे. त्याच्या आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध 37 वनडे विकेट्स झाल्या आहेत.

त्याने या विक्रमाच्या यादीत अजित अगरकरला मागे टाकले आहे. अगरकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६ वनडे विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर कपिल देव असून त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत 45 विकेट्स घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

45 विकेट्स - कपिल देव

37 विकेट्स - मोहम्मद शमी

36 विकेट्स - अजित अगरकर

33 विकेट्स - जवागल श्रीनाथ

32 विकेट्स - हरभजन सिंग

भारतासमोर 277 धावांचे आव्हान

दरम्यान, मोहालीमध्ये सुरू असलेल्या वनडेत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 276 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तसेच भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com