Ravi Bishnoi  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AFG: दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये 'बिश्नोई'ची कमाल; टीम इंडियाने नोंदवला रोहमहर्षक विजय!

India vs Afghanistan 3rd T20: बंगळुरु येथे भारतीय संघ आणि अफगाणिस्तान यांच्यात अतिशय रोमांचक सामना खेळला गेला.

Manish Jadhav

India vs Afghanistan 3rd T20: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका होती. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 212 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्ताननेही 212 धावा केल्या.

दरम्यान, पहिल्यांदा दोन्ही संघांमधील सामना बरोबरीत सुटला होता. यानंतर दोन सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघ केवळ 16-16 धावाच करु शकले आणि ही सुपर ओव्हरही टाय झाली. त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने विजय नोंदवला.

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने 5 चेंडूत 11 धावा केल्या होत्या. यानंतर कर्णधार रोहित शर्माने फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला गोलंदाजीसाठी पाचारण केले. बिश्नोईने आपल्या फिरकीच्या जोरावर अफगाणिस्तानच्या फलंदाजांना जाळ्यात अडकवले. बिश्नोईने पहिल्यांदा मोहम्मद नबी आणि नंतर रहमानउल्ला गुरबाजला आऊट केले. अशाप्रकारे या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत अफगाणिस्तानचा 3-0 असा क्लीन स्वीप केला. या सामन्यात रोहित शर्माने विक्रमी शतक झळकावून धमाका केला. तर रिंकू सिंहने झटपट अर्धशतक केले.

अफगाणिस्तानसाठी अजमतुल्ला उमरझाईने पहिली सुपर ओव्हर टाकली (16 धावा).

पहिला चेंडू: रोहितने एक धाव घेतली

दुसरा चेंडू: यशस्वीने एक धाव घेतली

तिसरा चेंडू: रोहितने षटकार मारला

चौथा चेंडू: रोहितने षटकार मारला

पाचवा चेंडू: रोहितने एक धाव घेतली

सहावा चेंडू: यशस्वीने एक धाव घेतली

भारतासाठी मुकेशने पहिली सुपर ओव्हर टाकली (16 धावा)

पहिला चेंडू: दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात गुलबदिन धावबाद.

दुसरा चेंडू : मोहम्मद नबीने एक धाव घेतली

तिसरा चेंडू: गुरबाजने चौकार मारला

चौथा चेंडू: गुरबाजने एक धाव घेतली

पाचवा चेंडू: नबीने षटकार मारला

सहावा चेंडू : नबीने 3 धावा काढल्या

रोहितने धोनीला मागे टाकले

दरम्यान, या सामन्यातील विजयासह रोहितने उत्कृष्ट विक्रमाच्या बाबतीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. वास्तविक, रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला 42 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तर धोनीच्या नेतृत्वाखाली 41 सामने जिंकले. अशाप्रकारे सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या बाबतीत रोहितने धोनीला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, या बाबतीत रोहितने अफगाणिस्तानचा असगर अफगाण, पाकिस्तानचा बाबर आझम आणि युगांडाचा ब्रायन मसाबा यांच्याशी बरोबरी साधली आहे, ज्यांनी सर्वाधिक 42 सामने जिंकले होते.

अफगाणिस्तानसाठी फरीदने दुसरी सुपर ओव्हर टाकली (11 धावा)

पहिला चेंडू: रोहितने षटकार ठोकला

दुसरा चेंडू: रोहितने चौकार मारला

तिसरा चेंडू: रोहितने एक धाव घेतली

चौथा चेंडू: रिंकू सिंह बाद

पाचवा चेंडू: रोहित धावबाद

भारतासाठी बिश्नोईने दुसरी सुपर ओव्हर टाकली (1 धाव)

पहिला चेंडू : मोहम्मद नबी झेलबाद

दुसरा चेंडू: करीम जनतने एक धाव घेतली

तिसरा चेंडू : रहमानउल्ला गुरबाज झेलबाद

सुंदरने 3 बळी घेत अफगाणिस्तान संघाला 212 धावांत रोखले

सामन्यात 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 6 विकेटवर 212 धावाच करु शकला. यामुळे सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम जादरान यांनी संघासाठी अर्धशतके झळकावली. तर मोहम्मद नबीने 16 चेंडूत 34 आणि गुरबदिन नायबने 23 चेंडूत 55 धावा केल्या. टीम इंडियाकडून फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर आवेश खान आणि कुलदीप यादवने 1-1 विकेट घेतली.

अफगाणिस्तान संघाच्या अशा विकेट्स पडल्या

पहिली विकेटः रहमानउल्ला गुरबाज (50), विकेट- कुलदीप यादव (93/1)

दुसरी विकेट: इब्राहिम जादरान (50), विकेट- वॉशिंग्टन सुंदर (107/2)

तिसरी विकेट: अजमतुल्ला उमरझाई (0), विकेट- वॉशिंग्टन सुंदर (107/3)

चौथी विकेट: मोहम्मद नबी (34), विकेट- वॉशिंग्टन सुंदर (163/4)

पाचवी विकेट: करीम जनत (2), विकेट- रनआउट (167/5)

सहावी विकेट: नजीबुल्ला जादरान (5), विकेट- आवेश खान (182/6)

रोहित-रिंकूची शानदार भागीदारी

दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावत 212 धावा केल्या होत्या. सुरुवातीला टीम इंडियाने 22 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. यशस्वी जयस्वाल 4 धावा करुन बाद झाला. तर विराट कोहली पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवम दुबे (1) आणि संजू सॅमसन (0) देखील बाद झाले. मात्र यानंतर रोहित शर्माने रिंकू सिंहच्या साथीने डावाची धुरा सांभाळत 5व्या विकेटसाठी 95 चेंडूत 190 धावांची भागीदारी केली.

टीम इंडियाच्या अशा विकेट्स पडल्या

पहिली विकेट: यशस्वी जयस्वाल (4), विकेट- फरीद अहमद (18/1)

दुसरी विकेट: विराट कोहली (0), विकेट- फरीद अहमद (18/1)

तिसरी विकेट: शिवम दुबे (1), विकेट- अजमतुल्ला उमरझाई (21/3)

चौथी विकेट: संजू सॅमसन (0), विकेट- फरीद अहमद (22/4)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार!म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

SCROLL FOR NEXT