IND vs AFG: रोहित-रिंकू जोडीने करीम जनतला धुतले, शेवटच्या षटकात ठोकल्या 36 धावा!

India vs Afghanistan 3rd T20: या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि रिंकू सिंहचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला.
Rohit Sharma & Rinku Singh
Rohit Sharma & Rinku SinghDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Afghanistan 3rd T20: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना बंगळुरु येथे खेळवला जात आहे. तिसऱ्या T20 सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावून 212 धावा केल्या.

या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि रिंकू सिंहचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला. फलंदाजी करताना रोहित शर्माने शतक तर रिंकू सिंहने अर्धशतक झळकावले. डावाच्या शेवटच्या षटकात रोहित आणि रिंकूने मिळून 36 धावा केल्या. सुरुवातीला टीम इंडियाने अवघ्या 22 धावांवर चार विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर रोहित शर्मा आणि रिंकूने डावाची धुरा सांभाळली.

करीम जनतला धुतले

दरम्यान, टीम इंडियाा फलंदाजी करत असताना करीम जनतने अफगाणिस्तानच्या डावातील शेवटचे षटक टाकले. करीमने या षटकात 36 धावा दिल्या. करीमच्या या षटकात रोहित आणि रिंकूने 5 षटकार आणि 1 चौकार लगावला. या षटकात करीमने नो बॉलही टाकला. या नो बॉलवर त्याला षटकारही लागला. यानंतर करीमला फ्री हिटवरही षटकार लगावण्यात आला. करीमच्या या षटकात रोहित शर्माने 2 षटकार तर रिंकू सिंहने 3 षटकार ठोकले.

Rohit Sharma & Rinku Singh
IND vs AFG: सॅमसन, कुलदीपला मिळणार संधी? शेवटच्या T20I सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया

भारताने 212 धावा केल्या

या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 22 धावांवर टीम इंडियाला 4 मोठे धक्के बसले, तेव्हा रोहितचा निर्णय चुकीचा वाटत होता, पण क्रीजवर उपस्थित असलेला कर्णधार रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांनी शानदार फलंदाजी करुन निर्णय योग्य दाखवला. या दोन फलंदाजांमध्ये 5व्या विकेटसाठी 190 धावांची नाबाद भागीदारी झाली. रोहितने 121 धावांची नाबाद खेळी तर रिंकू सिंहने 69 धावांची नाबाद खेळी खेळली. त्यामुळे टीम इंडियाला 212 धावांपर्यंत मजल मारता आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com