Semi Final Of U 19 ODI Cricket World Cup 2024 X, @BCCI
क्रीडा

U19 World Cup 2024: टॉस ठरणार गेमचेंजर! उपांत्य फेरीत भारत आफ्रिकेशी भिडणार

Ind Vs SA Semi Final: टीम इंडियाने 19 वर्षांखालील विश्वचषकाचे विजेतेपद सर्वाधिक 5 वेळा जिंकले आहे. भारतीय संघाने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये अंडर-19 क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे.

Ashutosh Masgaunde

In Under 19 ODI Cricket World Cup Semi Final India Will Face South Africa At Willomoor Park, Benoni:

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेला अंडर-19 विश्वचषक 2024 साठीची लढाई अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विलोमूर पार्क, बेनोनी येथे आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. दोन्ही संघातून जो संघ विजयी होईल तो अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल.

सध्या टीम इंडियाचे खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांनी संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. अंडर-19 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघ आतापर्यंत एकही सामना हरलेला नाही.

टॉस ठरू शकतो गेमचेंजर

विलोमूर पार्क, बेनोनी येथे टॉसची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. या मैदानावर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला फायदा होतो. आकडेवारीही हेच सांगते. या कारणास्तव, जो संघ टॉस जिंकेल, तो प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय पसंत करेल.

या मैदानावर आतापर्यंत 27 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने 17 सामने जिंकले आहेत. तर, 8 सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.

विलोमूर पार्क मैदानाची खास आकडेवारी

एकूण एकदिवसीय सामने: 27

प्रथम फलंदाजी करताना जिंकलेले सामने: 8

प्रथम गोलंदाजी करून जिंकलेले सामने: १७

पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या: २३३

दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या: १७९

सर्वोत्तम धावसंख्या: 399/6 दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे

भारत पाच वेळा विश्वविजेता

विलोमूर पार्कची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज खूप धोकादायक ठरू शकतात. अशा स्थितीत चाहत्यांना उपांत्य फेरीत कमी धावसंख्येचा सामना पाहायला मिळू शकतो.

युवा उदय सहारनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे.

टीम इंडियाने 19 वर्षांखालील विश्वचषकाचे विजेतेपद सर्वाधिक 5 वेळा जिंकले आहे. भारतीय संघाने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये अंडर-19 क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT