IND vs ENG: पराभूत होऊनही इंग्लंडने केला 'हा' मोठा रेकॉर्ड; भारताविरुद्धच्या चौथ्या डावात पहिल्यांदाच...

India vs England Test Series 2024: भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य ठेवले होते, प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 69.2 षटकात 292 धावांवर सर्वबाद झाला.
Ben Stokes
Ben StokesDainik Gomantak
Published on
Updated on

India vs England Test Series 2024: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 106 धावांनी जिंकून इंग्लंडविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधली आहे. विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने चौथ्या दिवशी विजय मिळवून मालिकेत पुनरागमन केले. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य ठेवले होते, प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 69.2 षटकात 292 धावांवर सर्वबाद झाला.

दरम्यान, हैदराबादमध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना भारताने 28 धावांनी गमावला होता, पण दुसरी कसोटी 106 धावांनी जिंकून पहिल्या कसोटीतील पराभवाचा बदला घेतला. मालिकेतील तिसरा कसोटी सामना आता 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. सामन्यात 9 विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला 'सामनावीर' म्हणून निवडण्यात आले. या सामन्यात इंग्लंडचा 106 धावांनी पराभव झाला असला तरी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

Ben Stokes
IND vs ENG: जस्सीच्या ताबडतोब 9 विकेट्स! रोहितसेनेने जिंकली दुसरी कसोटी; मालिकेत 1-1 अशी बरोबरी

दुसरीकडे, कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय भूमीवर चौथ्या डावात इंग्लंडची (England) ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. याआधी भारतीय भूमीवर चौथ्या डावात इंग्लंडची सर्वोत्तम धावसंख्या 1964 मध्ये झाली होती. त्यानंतर इंग्लंडने चौथ्या डावात 5 विकेट गमावत 241 धावा केल्या होत्या. भारतात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात चौथ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडने 200 हून अधिक धावा करण्याची ही सहावी वेळ होती. याआगोदर 1972 मध्ये इंग्लंडने भारतात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात 200 हून अधिक धावा केल्या होत्या. त्यानंतर दिल्लीत खेळवण्यात आलेला कसोटी सामना इंग्लंडने चौथ्या डावात 208 धावांनी जिंकला होता.

Ben Stokes
IND vs ENG: गिलने बनवला सुपर संडे! तब्बल 11 महिने अन् 12 डावांनंतर झळकावलं कसोटी शतक, पाहा Video

एकूणच, भारतामध्ये (India) कसोटी सामने खेळणाऱ्या संघांमध्ये चौथ्या डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2017 मध्ये, श्रीलंकेने भारताविरुद्ध चौथ्या डावात खेळताना पाच गड्यांच्या मोबदल्यात 299 धावा केल्या होत्या आणि तो सामना अनिर्णित राहिला होता.

दुसरीकडे, विशाखापट्टणम कसोटीबद्दल बोलायचे झाल्यास भारताने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 253 धावांवर सर्वबाद झाला. भारताने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या आणि इंग्लंडला विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडचा संघ 292 धावांवर सर्वबाद झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com