क्रीडा

Indian Super league: ‘सुपर सब’ सिव्हेरियोमुळे हैदराबाद अव्वल

सलग आठ सामने अपराजित राहताना हैदराबादच्या संघाने (Hyderabad Team) एटीके मोहन बागानला (ATK Mohan Bagan) 2-2 असे गोलबरोबरीत रोखले.

किशोर पेटकर

पणजी: स्पेनचा 24 वर्षीय युवा आघाडीपटू हावियर सिव्हेरियो बुधवारी रात्री हैदराबाद एफसीसाठी मौल्यवान ‘सुपर सब’ ठरला. भरपाई वेळेतील पहिल्याच मिनिटास त्याने नोंदविलेल्या गोलमुळे हैदराबाद एफसीला इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत अव्वल स्थानी झेप घेतला आली. सलग आठ सामने अपराजित राहताना हैदराबादच्या संघाने (Hyderabad Team) एटीके मोहन बागानला (ATK Mohan Bagan) 2-2 असे गोलबरोबरीत रोखले.

सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. नव्वदाव्या मिनिटापर्यंत एटीके मोहन बागान संघ 2-1 आघाडीसह विजयाच्या दिशेने झेपावत होता. 76व्या मिनिटास बदली खेळाडू या नात्याने मैदानात आलेल्या सिव्हेरियो याने 90+1व्या मिनिटास आयएसएलमधील पहिल्या मोसमातील वैयक्तिक तिसरा गोल केला आणि संघाला बरोबरीचा एक गुण मिळवून दिला. आकाश मिश्राच्या असिस्टवर एटीके मोहन बागानचा बचाव विस्कळित झाल्याची संधी सिव्हेरियो याने साधली. आता हैदराबादचे एकूण 16 गुण झाले. त्यांनी गतविजेत्या मुंबई सिटीस गुणतक्त्यात गाठले. मात्र हैदराबादची गोलसरासरी +11 अशी सरस असल्याने मुंबई सिटीस (+5) मागे टाकून ते पहिल्या स्थानी आले. मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने आता सलग 8 सामन्यांत 4 विजय व 4 बरोबरी अशी अपराजित कामगिरी केली आहे. विजय हुकल्यामुळे हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानला 15 गुणांसह तिसऱ्या स्थानी राहावे लागले. त्यांची ही स्पर्धेतील तिसरी बरोबरी ठरली.

12 व्या सेकंदात गोल

सामन्याच्या 12 व्या सेकंदात ऑस्ट्रेलियन आघाडीपटू डेव्हिड विल्यम्स याने मोसमातील सर्वांत वेगवान गोल केला, त्यामुळे एटीके मोहन बागानला आघाडी मिळाली. विल्यम्सचा वेगवान फटका अडविण्यासाठी हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने आटोकाट प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. त्यानंतर 18व्या मिनिटास एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याच्या चुकीमुळे हैदराबादला बरोबरी साधता आली. नेटसमोर गर्दी असताना अमरिंदर चेंडू व्यवस्थित अडवू शकला नाही व चेंडूचा ताबा नायजेरियन बार्थोलोम्यू ओगबेचे याच्याकडे गेला. या फॉर्ममधील आघाडीपटूने वेळीस संधी साधताना मोसमातील वैयक्तिक नववा गोल केला. 64व्या मिनिटास हैदराबादच्या आशिष राय याच्या स्वयंगोलमुळे एटीके मोहन बागानला 2-1 अशी आघाडी मिळाली. यावेळी डेव्हिड विल्यम्सच्या असिस्टवर फिनलंडचा विश्वकरंडक खेळाडू जॉनी कौको याने हेडिंग साधले, त्यावेळी चेंडू आशिषद्वारे नेटमध्ये गेला.

ओगबेचे अग्रस्थानी

आयएसएलच्या आठव्या मोसमात हैदराबादच्या बार्थोलोम्यू ओगबेचे याने गोल्डन बूटसाठीच्या यादीत अग्रस्थान मिळविले आहे. मोसमातील 9 सामन्यांत 9 गोल नोंदवून तो आता अव्वल स्थानी आहे. मुंबई सिटीचा स्पॅनिश आघाडीपटू इगोर आंगुलो याच्यापेक्षा ओगबेचे याने एक गोल जास्त केला आहे. एकंदरीत त्याने 66 आयएसएल सामन्यांत 44 गोल नोंदविले आहेत. स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत तो तिसरा असून प्रथम स्थानी असलेल्या फेरान कोरोमिनास याला गाठण्यासाठी आणखी चार गोलची ओगबेचे याला आवश्यकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT