Hockey Dainik Gomantak
क्रीडा

फलटणच्या दोघी भारतीय ज्युनियर महिला हॉकी विश्‍वचषक संघात सामील!

दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ज्युनिअर स्पर्धेत सहभागी होणार; बंगळूरमध्ये प्रशिक्षण सुरू

दैनिक गोमन्तक

आसू : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) डिसेंबरमध्ये होणाऱ्या ज्युनिअर महिला हॉकी विश्‍वचषक स्पर्धेसाठी (Women's Hockey World Cup) नुकतीच भारतीय ज्युनिअर महिला हॉकी विश्‍वचषक संघाची घोषणा झाली. या भारतीय संघात आसू (ता. फलटण) येथील वैष्णवी विठ्ठल फाळके आणि वाखरी (ता. फलटण) येथील अक्षता आबासाहेब ढेकळे या दोन खेळाडूंचा समावेश आहे. शेतकरी कुटुंबातील या दोन्ही मुलींची भारतीय संघात निवड झाल्याने फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

बंगळूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरात भारतीय ज्युनिअर महिला हॉकी (Hockey) विश्‍वचषक स्पर्धेसाठी 18 खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यात कर्णधार लालरेमसियामी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय ज्युनिअर महिला हॉकी विश्‍वचषक संघात महाराष्ट्रातून वैष्णवी फाळके व अक्षता ढेकळे यांचा समावेश झाला आहे. हा भारतीय संघ 28 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहे.

विश्‍वचषक स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील 16 संघ सहभागी होणार असून, भारतीय संघाचा ‘क’ गटात समावेश आहे. त्यात भारत, अर्जेंटिना, जपान आणि रशिया या संघाचा समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंचा डिसेंबर 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिरंगी मालिकेतील भारतीय संघातही समावेश होता. त्यानंतर 17 आणि 18 जानेवारी 2020 रोजी चिली येथील ज्युनिअर महिला हॉकी संघाशी, तर वरिष्ठ महिला संघाशी झालेल्या सहाही सामन्यांत या दोन्ही खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिला होता.

फलटण तालुक्यातील या दोन्ही मुलींनी साताऱ्याचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे. बालेवाडी पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीमधील प्रशिक्षक अजित लाक्रा यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे. सध्या या दोन्ही खेळाडू बंगळूरमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. ज्युनिअर महिला हॉकी विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल वैष्णवी फाळके व अक्षता ढेकळे यांचे कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cooch Behar Trophy: लाखमोलाची आघाडी! बंगालविरुद्ध अनिर्णित लढत; गोव्याच्या U-19 संघाने पहिल्या डावातील 27 धावांच्या जोरावर गाठली बाद फेरी

Goa Advocate General: बेकायदेशीर कामांमध्ये गोमंतकीयांचाही हात, असं का म्हणाले अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम?

Arpora Nightclub Fire Case: ...म्हणून लुथरा बंधूं देशाबाहेर पळाले, हडफडे दुर्घटनाप्रकरणी सरकारी यंत्रणांची मोठी चूक

South Goa Hotel Inspection: हडफडेच्या आगीचा धसका! दक्षिण गोव्यातील 15 हॉटेल्स-पब्जकडे NOC चं नाही, तपासणीत मोठा खुलासा

Goa Rent-a-Car: 'निर्णय मागे घ्या' नाहीतर...! रेन्ट अ कार व्यावसायिकांची पणजीत धडक; वाहतूक खात्याचा परवाना निर्णयाविरुद्ध संताप

SCROLL FOR NEXT