Goa River Marathon Dainik Gomantak
क्रीडा

Goa River Marathon: गोवा रिव्हर मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राचा डंका! रत्नागिरीचा निलेश, मुंबईची ऊर्मिला अव्वल

Goa River Marathon: गोवा रिव्हर मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीच्या नीलेश कुळये याने पुरुषांत, तर मुंबईच्या ऊर्मिला बानी हिने 42 किलोमीटर शर्यतीत अव्वल क्रमांक पटकावला.

Manish Jadhav

Goa River Marathon: गोवा रिव्हर मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीच्या नीलेश कुळये याने पुरुषांत, तर मुंबईच्या ऊर्मिला बानी हिने 42 किलोमीटर शर्यतीत अव्वल क्रमांक पटकावला. स्पर्धा रविवारी चिखली-वास्को येथे झाली. नीलेशने 42 किलोमीटर शर्यत 2 तास 49.33 मिनिटांत पूर्ण केली. LJ हेच अंतर ऊर्मिला हिने 4 तास 15.25 मिनिटांत पार केले.

चिखलीच्या डोंगराळ भागातून निर्धारित वेळेत मॅरेथॉन पूर्ण करणे खूपच आव्हानात्मक ठरते, असे गोवा रिव्हर मॅरेथॉनमध्ये सलग तिसऱ्या वर्षी पोडियम फिनिश मिळवलेल्या नीलेश याने सांगितले. अर्धमॅरेथॉनमध्ये (21.1 किलोमीटर) रत्नागिरीच्या सिद्धेश बार्जे याने पुरुषांत प्रथम क्रमांक पटकावताना 1 तास 13.24 मिनिटे वेळ नोंदवली. तर महिलांमध्ये गोव्याची सपना पटेल अव्वल ठरली. तिने शर्यत 1 तास 35.26 मिनिटांत पूर्ण केली.

दरम्यान, स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आलेल्या 20 मायलर (32 किलोमीटर) शर्यतीत अमेरिकेची मॅरिसा मर्फी (2 तास 44.19 मिनिटे) हिने महिलांत आणि उडुपी (कर्नाटक) चा सचिन पुजारी (1 तास 57.51 मिनिटे) याने अव्वल कामगिरी नोंदवली. शालेय गटातील पाच किलोमीटर सांघिक शर्यतीत मुलांत मुरगाव हायस्कूलने, तर मुलींत विद्या विहार स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. गोवा रिव्हर मॅरेथॉनच्या तेराव्या आवृत्तीत गोव्यासह दिल्ली, बंगळूर, मुंबई, पुणे, ठाणे येथील धावपटू मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते, शिवाय अमेरिका, इंग्लंड, नेदरलँड्समधील धावपटूंचाही सहभाग उल्लेखनीय ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

Oracle Layoffs 2026: सकाळी 6 वाजता मेल आला अन् नोकरी गेली! ओरॅकलने पुन्हा दिला कर्मचाऱ्यांना नारळ; टेक कंपन्यांमध्ये चाललंय तरी काय?

Viral Video: ना धड इंग्रजी बोलता येईना, ना वाचता येईना! पाकिस्तानी आमदाराचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

SCROLL FOR NEXT