Australia Team  Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: ऑस्ट्रेलियाचे जबरदस्त पुनरागमन, श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव!

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने पहिला विजय मिळवला आहे.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने पहिला विजय मिळवला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने 43.3 षटकांत सर्व गडी गमावून 209 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात मिचेल मार्श आणि जोश इंग्लिस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 89 चेंडू शिल्लक असताना 5 विकेट्स राखून सामना जिंकला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) प्रथम फलंदाजी करताना कुसल परेरा आणि पाथुम निसांका यांच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने 43.3 षटकांत सर्व गडी गमावून 209 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून कुसल परेराने सर्वाधिक 78 धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अॅडम झाम्पाने सर्वाधिक 4, मिचेल स्टार्कने 2 विकेट घेतल्या. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेच्या (Sri Lanka) संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली सुरुवात केली. पथुम निसांका आणि कुसल परेरा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी झाली.

पथुम निसांका 67 चेंडूत 61 धावा करुन बाद झाला. तर कुसल परेरा 82 चेंडूत 78 धावा करुन बाद झाला.

मार्श- लॅब्युशेनने संघाची धुरा सांभाळली

दरम्यान, ऑस्ट्रेलियासमोरचे लक्ष्य फार मोठे नव्हते, पण संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला दिलशान मदुशंकाने बाद केले. त्याला केवळ 11 धावा करता आल्या.

या षटकातील शेवटच्या चेंडूवर मदुशंकाने स्टीव्ह स्मिथला बाद केले. यादरम्यान ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत सापडला होता. अशा स्थितीत मिचेल मार्श आणि मार्नस लॅब्युशेन यांनी संघाची धुरा सांभाळली. दोघांनी 57 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, मार्शने आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर तो आऊट झाला. मार्श 81 च्या एकूण धावसंख्येवर धावबाद झाला. 52 धावांच्या खेळीत त्याने 51 चेंडूंचा सामना केला आणि नऊ चौकार मारले.

दुसरीकडे मात्र, लॅब्युशेनला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. त्यालाही मदुशंकाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने 60 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 40 धावा केल्या.

इंग्लिस-मॅक्सवेलचे वादळ

तथापि, लॅब्युशेन आऊट झाल्यानंतर यष्टिरक्षक-फलंदाज जोस इंग्लिसने ग्लेन मॅक्सवेलसोबत संघाला सहज विजयापर्यंत नेले. 34 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इंग्लिश बाद झाला. त्याने 59 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 58 धावा केल्या.

त्याच्या पाठोपाठ आलेल्या मार्कस स्टॉयनिसनेही तुफानी फलंदाजी केली. त्याने 10 चेंडूत दोन चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 20 धावा केल्या. मॅक्सवेलने 21 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 31 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT