Iga Swiatek Dainik Gomantak
क्रीडा

French Open 2023: स्विअतेकने जिंकले चौथे ग्रँडस्लॅम, फायनलमध्ये मुचोवा पराभूत

पोलंडच्या इगा स्विअतेकने फ्रेंच ओपन 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.

Pranali Kodre

Iga Swiatek win French Open 2023 title: पॅरीसमध्ये सुरु असलेल्या फ्रेंच ओपन 2023 स्पर्धेत शनिवारी (10 जून) महिला एकेरीचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात अव्वल मानांकित इगा स्विअतेकने विजय मिळवत फ्रेंच ओपनचे विजेतेपद राखले.

पोलंडच्या इगाने अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोवा हिला 6-2, 5-7, 6-4 तीन सेटमध्ये पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले. हे तिचे कारकिर्दीतील चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. तिने यापूर्वी 2020, 2022 आणि 2023 यावर्षी फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकले आहे. तसेच 2023 मध्ये अमेरिकन ओपनचे विजेचेपद जिंकले आहे.

इगा तिच्या कारकिर्दीतील पहिल्या चार ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यांमध्ये विजय मिळवणारा ओपन एरामधील तिसरीच महिला खेळाडू आहे. यापूर्वी मोनिका सेल्स आणि नाओमी ओसाका यांनी असा कारनामा केला आहे.

तसेच इगा बेल्जियमच्या जस्टिन हेनिननंतर लागोपाठ फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणारी पहिला महिला खेळाडू ठरली आहे. हेनिनने 2005, 2006 आणि 2007 साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. तसेच ती सेरेना विलियम्सनंतर चार ग्रँडस्लॅम जिंकणारी सर्वात युवा महिला टेनिसपटू ठरली आहे. सेरेनाने 2002 मध्ये युएस ओपनमध्ये चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले होते.

अंतिम सामन्यात पहिल्या सेटमध्ये इगाने वर्चस्व गाजवले होते. तिने या सेटमध्ये तिची लय कायम ठेवले. मिचोवाला मात्र या सेटमध्ये लय ठेवता आली नाही. त्यामुळे तिने हा सेट 6-2 असा सहज जिंकला. पण दुसऱ्या सेटमध्ये मात्र मुचोवाने इगाला चांगली लढत दिली.

दुसराच सेट दोघीमध्येही अटीतटीचा झाला. पण या सेटमध्ये मुचोवाने बाजी मारली आणि सेट 7-5 ने जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्येही 4-4 अशी बरोबरी झाली होती. पण त्यानंतर इगाने वर्चस्व ठेवत हा सेट जिंकला आणि तिसऱ्यांदा फ्रेँच ओपनवर नाव कोरले.

जोकोविच-रुडमध्येही अंतिम सामना

दरम्यान, फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरीत रविवारी नोवाक जोकोविच आणि कॅस्पर रुड यांच्यात अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात जर जोकोविचने विजय मिळवला, तर तो एकेरीत 23 ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला पुरुष टेनिसपटू ठरेल. तसेच जर रुडने विजय मिळवला, तर तो त्याच्या कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जिंकेल.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की जोकोविच आणि रुड हे आत्तापर्यंत 4 वेळा आमने-सामने आले आहेत. यातील चारही सामन्यात 36 वर्षीय जोकोविचने बाजी मारली आहे. त्यामुळे रविवारीही जोकोविच रुडवरील वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर रुड जोकोविचविरुद्ध पहिला विजय मिळवण्यासाठी उत्सुक असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Budget Session 2026: गदारोळात गोवा विधानसभा अधिवेशनाचा समारोप! अर्थसंकल्प मंजूर; आचारसंहितेमुळे 7व्या दिवशीच वाजले सूप

VIDEO: ''माझी इच्छा आहे की, एक दिवस त्यानं माझ्या जागेवर यावं अन्...'', कॅप्टन कूलच्या 'त्या' पोस्टवर काय म्हणाला गंभीर?

Middle East War: "इराण सोडण्याच्या घाईत जीव धोक्यात घालू नका!" भारतीय दूतावासाकडून नवी नियमावली जारी; सीमा ओलांडण्यावर कडक बंदी

VIDEO: धुरंधरमध्ये 'पाकिस्तानी गाणं'! सिंगर हसननं केला मोठा खुलासा; निर्मात्यांनी 55 लाख दिल्याचा केला दावा

PAK vs BAN: "...मग आता ट्रॉफी चोरुन आणणार का?" PCB प्रमुखांच्या 'त्या' कृत्यावरुन अकमलनं उडवली खिल्ली; बांगलादेश मालिका गमावल्याचा काढला राग

SCROLL FOR NEXT