WTC Final 2023: लंडनमध्ये रोहित शर्माचा मोठा पराक्रम, तेंडुलकरचा मोडला 'हा' रेकॉर्ड!

Team India: भारतीय संघ सध्या लंडनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final-2023) चा अंतिम सामना खेळत आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma Record, WTC Final-2023: भारतीय संघ सध्या लंडनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final-2023) चा अंतिम सामना खेळत आहे. या सामन्यात भारताला विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य मिळाले होते. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने एका बाबतीत महान सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.

भारताला 444 धावांचे लक्ष्य मिळाले

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final-2023) चा सामना आता अंतिम टप्प्यात आहे. या सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 8 बाद 270 धावा करुन आपला दुसरा डाव घोषित केला.

यासह टीम इंडियाला (Team India) विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य मिळाले. कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 469 धावा केल्या, त्यानंतर भारताचा डाव 296 धावांवर संपला.

Rohit Sharma
WTC 2023 Final Video: बोलंडचा विराटच्या कमजोरीवर वार अन् स्मिथचा शानदार कॅच, जडेजाही शुन्यावर बाद

सचिनला मागे सोडले

दरम्यान, सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो आता तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या डावातील 7 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रोहितने फाइन लेगच्या दिशेने षटकार ठोकला आणि सचिनला मागे टाकले.

Rohit Sharma
WTC 2023 Final: "विराट आला अन् थेट स्मिथला तोंडावर म्हणाला, खराब शॉट खेळला..."

सेहवाग टॉपवर

रोहितच्या नावावर आता टेस्ट फॉरमॅटमध्ये एकूण 70 षटकार आहेत. महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर या फॉर्मेटमध्ये 69 षटकार आहेत. या यादीत भारताचा माजी अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे नाव अग्रस्थानी आहे.

सेहवागने आपल्या कसोटी कारकिर्दीत 90 षटकार ठोकले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (78 षटकार) आहे. या यादीत रोहित आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com