Team India Dainik Gomantak
क्रीडा

ICC WTC Points Table: डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये टीम इंडियाला बंपर फायदा; इंग्लंडला हरवून गाठले 'हे' स्थान

ICC WTC Points Table 2023-2025: दुसरी कसोटी जिंकल्यानंतर भारताने तीन अकांनी झेप घेतली असून आता संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Manish Jadhav

ICC WTC Points Table 2023-2025: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 106 धावांनी पराभव करुन मालिकेत पुनरागमन तर केलेच पण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठी झेप घेतली आहे. या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर, भारत WTC गुणतालिकेत 5 व्या स्थानावर घसरला होता.

विशाखापट्टणम कसोटीपूर्वी टीम इंडियाच्या नावावर केवळ 43.33 टक्के पॉइंट्स होते, मात्र दुसरी कसोटी जिंकल्यानंतर भारताने तीन अकांनी झेप घेतली असून आता संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताच्या खात्यात आता 52.78 टक्के पॉइंट्स आहेत. 5 सामन्यांची ही कसोटी मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे.

दुसरीकडे, बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला क्रमवारीत कोणतेही नुकसान झाले नाही, परंतु त्यांच्या टक्केवारीत नक्कीच घट झाली आहे. या पराभवानंतरही इंग्लंडचा संघ 8व्या क्रमांकावर असला तरी आता त्यांच्या खात्यात केवळ 25 टक्के पॉइंट्स शिल्लक आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या सत्रात भारताची कामगिरी संमिश्र झाली आहे. टीम इंडियाने या सायकलमध्ये 6 सामने खेळले आहेत, ज्यात 3 जिंकले असून 2 गमावले आहेत. या काळात टीम इंडियाचा एक सामना अनिर्णित राहिला आहे.

दरम्यान, इतर संघांबद्दल बोलायचे झाल्यास गतविजेता ऑस्ट्रेलिया तिसऱ्या फेरीतही पहिल्या क्रमांकावर आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील या संघाच्या खात्यात 55 टक्के पॉइंट्स आहेत. तिसऱ्या कसोटीतही इंग्लंडला पराभूत करण्यात भारताला यश आले तर टीम इंडियाला डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये नंबर-1 होण्याची संधी असेल.

न्यूझीलंडही शर्यतीत

न्यूझीलंड संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या दोन दिवसांच्या खेळात यजमान संघाने स्पर्धेवरील आपली पकड मजबूत केली आहे. जर किवी संघ हा सामना जिंकला तर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या वरच्या क्रमांकावर पोहोचेल. न्यूझीलंडच्या खात्यात सध्या 50 टक्के पॉंइट्स आहेत. हा सामना जिंकल्याने त्यांच्या खात्यात आणखी 12 पॉइंट्स जमा होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narkasur Celebration: नरकासुर प्रदर्शनावेळी पणजीत वाढला दणदणाट! आवाज 100 डेसिबलपेक्षा जास्त; नागरिकांच्या तक्रारी

Ravi Naik: स्मृतींचा जागर, आठवांचा गहिवर! 'रवीं'ना आदरांजली; मुख्‍यमंत्री, मंत्री, आमदार, हितचिंतकांचे अभिवादन

Diwali in Goa: नरकासुर वध, पाच प्रकारचे 'पोहे'; गोव्याची दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा पारंपरिक विजयोत्सव

Horoscope: घरात ऐश्वर्य आणि आनंदाचा वर्षाव, वातावरण अत्यंत मंगलमय राहील; दिवाळीच्या दिवशी कसा असेल तुमचा दिवस?

Viral Video: ट्रॅक्टरला रथासारखी चाकं... सोशल मीडियावर व्हायरल झाला भन्नाट 'जुगाड', लोक म्हणाले, "हा आहे नवा भारत"

SCROLL FOR NEXT