WTC Points Table: टीम इंडिया पुन्हा नंबर 1, ऐतिहासिक विजयाचा भारताला डबल फायदा

IND vs SA Capetown Test: टीम इंडिया आता पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचली आहे. याआधी सेंच्युरियन कसोटीतील पराभवानंतर टीम इंडिया टॉप 3 मध्येही नव्हती.
Team India
Team IndiaDainik Gomantak

IND vs SA Capetown Test, WTC Points Table: केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना 7 गडी राखून जिंकून भारतीय संघाने इतिहास रचला आहे. या विजयासह टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सध्याच्या सायकलमध्ये मोठा फायदा झाला आहे. टीम इंडिया आता पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचली आहे. याआधी सेंच्युरियन कसोटीतील पराभवानंतर टीम इंडिया टॉप 3 मध्येही नव्हती. स्लो ओव्हर रेटसाठी दोन गुणही कापले गेले.

टीम इंडिया टॉप

दरम्यान, केपटाऊन कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर भारताने आता पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे. या विजयासह टीम इंडियाचे 12 गुण झाले आहेत. त्याची विजयाची टक्केवारीही सर्वोत्तम ठरली आहे. भारतीय संघाने WTC च्या चालू आवृत्तीत आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, त्यापैकी एक पराभव आणि दोन जिंकले आहेत. तसेच, एक सामना अनिर्णित राहिला आहे. टीम इंडियाकडे सर्वाधिक 26 गुण आहेत आणि सर्वाधिक विजयाची टक्केवारी 54.16 आहे.

Team India
SA vs IND: गोलंदाजांनी फोडला फलंदाजांना घाम! 7 तासांत घेतल्या 23 विकेट्स, तर भारताचे 6 खेळाडू शून्यावर बाद

दुसरीकडे, या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे 12 गुण झाले असून विजयाची टक्केवारी 50 आहे. या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया चौथ्या आणि बांगलादेश पाचव्या स्थानावर आहे. या तीन संघांची विजयाची टक्केवारी 50-50 आहे. ऑस्ट्रेलियात दोन कसोटी सामने गमावलेला पाकिस्तान संघ 45.8 विजयाच्या टक्केवारीसह सहाव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज सातव्या तर इंग्लंड आठव्या क्रमांकावर आहे. तसेच, श्रीलंकेने अद्याप आपले खाते उघडलेले नाही आणि संघ शेवटच्या म्हणजे 9व्या स्थानावर आहे.

केपटाऊनमध्ये टीम इंडियाने इतिहास रचला

केपटाऊनमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेटने पराभव करत मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. या विजयासह भारताने केवळ मालिकाच वाचवली नाही तर केपटाऊनमध्ये 31 वर्षांनंतर पहिला कसोटी विजयही नोंदवला. हा कसोटी सामना दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात अवघ्या 107 षटकांत संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात लहान कसोटी सामना होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com