World Test Championship 2021 - 2023
World Test Championship 2021 - 2023 Dainik Gomantak
क्रीडा

World Test Championship 2023: ठरलं तर! या दिवशी WTC फायनल होणार सुरु, ICC ची मोठी घोषणा

Pranali Kodre

World Test Championship 2023: आयसीसीने बुधवारी (8 फेब्रुवारी) मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारिख जाहीर केली आहे. यंदा 7 ते 11 जून 2023 दरम्यान अंतिम सामना पार पडणार आहे.

आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship) स्पर्धेचे हे दुसरे पर्व आहे. यापूर्वी 2021 मध्ये 18 ते 23 जून दरम्यान पहिल्या पर्वाचा अंतिम सामना पार पडला होता. त्यावेळी न्यूझीलंडने भारताला 8 विकेट्सने पराभूत करत कसोटीतील पहिला विश्वविजेता संघ होण्याचा मान मिळवला होता.

(ICC World Test Championship 2021-2023 Final dates announced)

त्यानंतर आता 2021 ते 2023 दरम्यान या स्पर्धेचे दुसरे पर्व खेळवण्यात येत आहे. या दुसऱ्या पर्वाचा अंतिम सामना इंग्लंडमधील लंडन शहरातील द ओव्हल मैदानावर 7 ते 11 जून 2023 दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तसेच 12 जून हा अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही असेल, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.

ही स्पर्धा 9 कसोटी संघात खेळवण्यात येते. या 9 संघांना या स्पर्धेअंतर्गत 2 वर्षांच्या कालावधीत 3 मायदेशात आणि 3 परदेशात कसोटी मालिका खेळायच्या असतात. त्यानुसार गुणतालिकेत अव्वल दोन क्रमांकावर राहणारे संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतात.

सध्या या स्पर्धेतील काही कसोटी मालिका अद्याप आगामी काळात खेळवल्या जाणार आहे. त्यानंतर अंतिम दोन संघ निश्चित होतील. बुधवारपासून (9 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु होणारी कसोटी मालिकादेखील कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे ही मालिका दोन्ही संघांसाठी अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे अंतिम सामन्यातील स्थान जवळपास पक्के आहे. त्यांचा संघ सध्या गुणतालिकेत 75.56 च्या विजयी टक्केवारीसह अव्वल क्रमांकावर आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघ असून त्यांची विजयाची टक्केवारी 58.93 टक्के आहे.

तसेच तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेची विजयी टक्केवारी 53.33 आहे, तर चौथ्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेची 48.72 इतकी विजयी टक्केवारी आहे. दरम्यान, त्याखालोखाल इंग्लंड (46.97), वेस्ट इंडिज (40.91), पाकिस्तान (38.1), न्यूझीलंड (27.27) आणि बांगलादेश (11.11) हे संघ आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

India Canada Relations: जस्टिन ट्रुडोचे पुन्हा बरळले, आम्ही खलिस्तानसोबत आहोत; भारतासोबतच्या संबंधांवर काय म्हणाले?

Loksabha Election : प्रचारासाठी पायाला भिंगरी, जनसामान्‍यांना भेटीची आस; पल्‍लवी धेंपे यांचा प्रचार

Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

SCROLL FOR NEXT