ICC ची मोठी घोषणा, या दोन मैदानांना 2023 अन् 2025 WTC फायनलचे मिळणार यजमानपद

ICC ने बुधवारी एक मोठी घोषणा केली आहे.
ICC
ICCDainik Gomantak
Published on
Updated on

ICC World Test Championship Final: आयसीसीने (ICC) बुधवारी एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमध्ये 'द ओव्हल' आणि 'लॉर्ड्स' वर अनुक्रमे 2023 आणि 2025 मध्ये होणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलचे आयोजन करण्यात येणार आहे. जुलैमध्ये बर्मिंगहॅम येथे आयसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत पुढील दोन WTC फायनलचे यजमानपदासाठी इंग्लंडची निवड करण्यात आली आहे.

ICC ने केली मोठी घोषणा

आयसीसीचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ अल्लार्डिस यांनी एका निवेदनात म्हटले की, "आम्हाला आनंद होत आहे की, पुढील वर्षी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन 'द ओव्हल' वर केले जाईल. तर 2025 च्या अंतिम सामन्याचे आयोजन लॉर्ड्सवर करण्यात येणार आहे."

ICC
ICC T20 World Cup: ऋषभ पंतला ओपनिंग करण्याची संधी द्यावी, वसीम जाफरचा रोहितला सल्ला

या दोन क्रिकेट मैदानांना 2023 आणि 2025 WTC चे होस्टिंग मिळाले

यामध्ये, ज्योफ अलार्डीस म्हणाले की, 'गेल्या वर्षी न्यूझीलंड (New Zealand) आणि भारत (India) यांच्यातील साउथॅम्प्टनमधील अंतिम सामना अटीतटीचा झाला होता. यातच मला खात्री आहे की, जगभरातील क्रिकेट चाहते 'ओव्हल' वर पुढील WTC फायनलची आतुरतेने वाट पाहत असतील.'

ICC
ICC ODI Rankings: न्यूझीलंडला मोठा धक्का, वनडे क्रमवारीत इंग्लंडचा वरचष्मा

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अव्वल

2023 आणि 2025 या दोन्ही आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ठिकाणांची घोषणा करण्यात आली आहे, परंतु त्यांच्या तारखांची अद्याप पुष्टी झालेली नाही. मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सचिव गे लॅव्हेंडर म्हणाले की, "लॉर्ड्सवर 2025 मध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) सध्या WTC टेबलमध्ये आघाडीवर आहेत.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com