Zimbabwe Dainik Gomantak
क्रीडा

World Cup Qualifiers 2023: झिम्बाब्वेचा तब्बल 304 धावांनी विजय! थोडक्यात बचावला टीम इंडियाचा पहिला क्रमांक

सोमवारी झिम्बाब्वेने 304 धावांनी विजय मिळवल्याने वनडेमधील एका खास विक्रमात भारतानंतर दुसराच क्रमांक मिळवला आहे.

Pranali Kodre

ICC World Cup Qualifiers 2023 Zimbabwe won by 304 runs against USA:

वर्ल्डकप 2023 क्वालिफायर स्पर्धेत सोमवारी हरारेला झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने अमेरिकेला तब्बल 304 धावांनी पराभूत केले. याबरोबरत त्यांनी मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तसेच या विजयाबरोबरच झिम्बाब्वेने ग्रुप ए मधील अव्वल स्थान पक्के केले आहे.

झिम्बाब्वेने 304 धावांनी मिळवलेला विजय हा वनडे क्रिकेट इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला ठरला आहे. त्यामुळे भारतीय संघाला विक्रम मोडण्यापासून थोडक्यात बचावला.

वनडे क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. भारताने याचवर्षी 15 जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध तिरुअनंतपुरम येथे श्रीलंकेविरुद्ध 317 धावांनी विजय मिळवला होता.

दरम्यान, झिम्बाब्वे हा भारतीय संघानंतरचा असा दुसराच संघ ठरला आहे, ज्यांनी 300 पेक्षा अधिक धावांनी वनडेत विजय मिळवला आहे.

वनडे क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय

317 धावांनी विजय - भारत विरुद्ध श्रीलंका (15 जून 2023)

304 धावांनी विजय - झिम्बाब्वे विरुद्ध अमेरिका (26 जून 2023)

290 धावांनी विजय - न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड (1 जुलै 2008)

275 धावांनी विजय - ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान (4 मार्च 2015)

272 धावांनी विजय - दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे (22 ऑक्टोबर 2010)

झिम्बाब्वेचा विजय

या सामन्यात झिम्ब्बावेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 408 धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिन विलियम्सने 101 चेंडूत 174 धावांनी आक्रमक शतकी खेळी केली. तसेच जॉयलॉर्ड गुम्बीने 78 धावांची खेळी केली.

तसेच सिकंदर रझाने 48 धावांची, रायन बर्लने 47 धावांची आणि इनोसेंट कायाने 32 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अमेरिकेकडून अभिषेक परडकरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच जेस्सी सिंगने 2 विकेट्स घेतल्या आणि नोस्तुश केन्जिगेने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 409 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अमेरिकेचा डाव 25.1 षटकातच 104 धावांवर संपुष्टात आला. अमेरिकेकडून अभिषेक परडकरने 24 धावांची खेळी केली. तसेच जेस्सी सिंगने 21 धावा केल्या, तर गजानंद सिंगने 13 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.

झिम्बाब्वेकडून रिचर्ड एनगरवा आणि सिकंदर रझा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच ब्रॅड इव्हान्स, ल्युक जोंग्वे आणि रायन बर्ल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: फोन चोरीपासून वाचवण्याचा तरुणाचा 'Z+ सिक्युरिटी' फॉर्म्युला, ट्रेनमधील अतरंगी व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "भावाला कशाचीच भीती नाही..."

T20 World Cup 2026: 'टी20 वर्ल्ड कप'साठी सर्व 20 संघ निश्चित; नेपाळ, ओमाननंतर जपानला हरवून यूएईनं तिकीट केलं पक्क; पाहा संपूर्ण यादी

रवींच्या निधनामुळे दुखवटा असताना सरकारने आयोजित केला सांस्कृतिक कार्यक्रम? सरकार असंवेदनशील असल्याचे काँग्रेसची टीका

Suicide Attack In Pakistan: पाकिस्तानी सैन्याच्या चेकपोस्टला पुन्हा बनवले निशाणा! आत्मघाती हल्ल्यात 20 सैनिक मारल्याचा दावा, धडकी भरणारा VIDEO व्हायरल

IND vs AUS Live Streaming: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामना मोफत कुठे पाहता येणार? काय आहे सामन्याची वेळ? जाणून घ्या सर्व

SCROLL FOR NEXT