India And Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

Women's T20 World Cup 2023: मैदानात जंग! भारत अन् पाकिस्तान पुन्हा आमने-सामने

India VS Pakistan: दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षी होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे.

दैनिक गोमन्तक

Women's T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षी होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना 12 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध केपटाऊनमध्ये खेळणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत.

दरम्यान, ICC महिला T20 विश्वचषकाच्या आठव्या एडिशनला 10 फेब्रुवारी 2023 पासून सुरुवात होणार असून पहिल्या दिवशी यजमान दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) सामना श्रीलंकेशी होणार आहे. स्पर्धेचे सामने पारल आणि गेबेरा येथे खेळवले जातील तर केपटाऊनमध्ये बाद फेरीचे सामने खेळवले जातील.

दुसरीकडे, 26 फेब्रुवारी 2023 रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. फायनलसाठी 27 फेब्रुवारी हा वेगळा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेत भारताला (India) पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि आयर्लंडसह गट 2 मध्ये ठेवण्यात आले आहे, तर गट 1 मध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलिया (Australia), न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश (Bangladesh) यांचा समावेश आहे. या गटातील सामने 21 फेब्रुवारीपर्यंत खेळवले जातील. प्रत्येक संघ त्यांच्या गटातील उर्वरित चार संघांविरुद्ध एक सामना खेळेल. यानंतर दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाविरुद्ध:

12 फेब्रुवारी - भारत विरुद्ध पाकिस्तान - केपटाऊन,

15 फेब्रुवारी - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - केपटाऊन,

18 फेब्रुवारी - भारत विरुद्ध इंग्लंड - गाकेबेरा

20 फेब्रुवारी - भारत विरुद्ध आयर्लंड - गाकेबेरा

23 फेब्रुवारी - उपांत्य फेरी 1- केपटाऊन

24 फेब्रुवारी - राखीव दिवस - केपटाऊन

24 फेब्रुवारी - उपांत्य फेरी 2- केपटाऊन

25 फेब्रुवारी - राखीव दिवस - केपटाऊन

26 फेब्रुवारी - अंतिम - केपटाऊन

27 फेब्रुवारी - रिझर्व्ह डे केपटाऊन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT