ICC Women's World Cup : ऑस्ट्रेलिया सातव्यांदा विश्वविजेता

ICC Women's World Cup : ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७१ धावांनी पराभव करत सातव्यांदा पटकावले विजेतेपद
ICC Women's World Cup
ICC Women's World Cupdainik gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : महिला विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७१ धावांनी पराभव करत सातव्यांदा विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने विक्रमी 356 धावा केल्या. महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील ही सर्वोच्च धावसंख्या होती. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ विशेष काही करू शकला नाही आणि पाचव्यांदा विश्वविजेता होण्यापासून दूर राहिला. इंग्लंडला चौथ्यांदा महिला विश्वाच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला एकदा पराभूत केले आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने 1978, 1982 आणि 1988 मध्ये सलग तीन वेळा महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव केला होता. (Australia won the World Cup title for the record seventh time)

ICC Women's World Cup
IPL 2022: शतक झळकावूनही जॉस बटलरला ऑरेंज कॅप मिळाली नाही, मानकरी ठरला 'हा' खेळाडू

या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 356 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 285 धावा करू शकला नाही आणि 71 धावांनी सामना गमावला.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन (Australia) संघाने चांगली सुरुवात केली. एलिसा हिली आणि रॅचेल हेन्स यांनी पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली. विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील ही सर्वात मोठी भागीदारी होती. त्यानंतर हिलीने मुनीसोबत 156 धावांची भागीदारी केली. विश्वचषकाच्या (World Cup) अंतिम फेरीतील ही दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली. हिलीने विक्रमी 170 धावा केल्या. हेन्सने 68 आणि मुनीने 62 धावा केल्या. अखेरीस पेरीने 17 धावा करत निर्धारित 50 षटकात 5 गडी गमावून 356 धावा केल्या.

इंग्लंडकडून (England) श्रबसोलेने तीन बळी घेतले. त्याचवेळी एक्लेस्टनला एक विकेट मिळाली. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांना पहिल्या 29 षटकांपर्यंत एकही विकेट घेता आली नाही आणि 46व्या षटकात दुसरी विकेट घेतली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com