Smriti Mandhana And Shefali Verma Dainik Gomantak
क्रीडा

T20 Rankings: स्मृती- शेफाली वर्मा टॉप-5 मध्ये कायम, मेग लेनिंग ठरली नंबर वन फलंदाज

ICC Women's T20 Rankings: मानधना 681 रेटिंग गुणांसह चौथ्या तर शेफाली 679 रेटिंग गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमन्तक

ICC Women's T20 Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी जाहीर केलेल्या महिला T20 क्रमवारीत भारताच्या स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टॉप-5 मध्ये कायम आहेत. मानधना 681 रेटिंग गुणांसह चौथ्या तर शेफाली 679 रेटिंग गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. मानधना आणि शेफाली व्यतिरिक्त एकही भारतीय फलंदाज टॉप 10 मध्ये नाही.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या (Australia) मेग लेनिंगने सहकारी बेथ मुनीला मागे टाकत नंबर वनची खुर्ची मिळवली. पाकिस्तान आणि आयर्लंडविरुद्ध चमकदार कामगिरी करणारी लेनिंग आता 731 रेटिंग गुणांसह जगातील नंबर वन टी-20 फलंदाज बनली आहे. मुनी आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. लेनिंग आणि मुनी यांच्यात तीन अंकाचा फरक आहे. तिने आयर्लंडविरुद्ध दोन डावात 113 धावा केल्या होत्या. त्याच सामन्यात मुनीला केवळ नऊ धावा करता आल्या.

दुसरीकडे, ताहलिया मॅकग्राही ताज्या फलंदाजीच्या क्रमवारीत 13 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. इंग्लंडविरुद्ध (England) निराशाजनक कामगिरी करुनही दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) त्रिकुट लॉरा वोल्वार्ड (14वे), ऍनी बॉश (21वे) आणि तझमिन ब्रिट्स (24वे) यांनीही फलंदाजांच्या यादीत लक्षणीय प्रगती केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohan Desai: रोहन देसाई यांचे भवितव्य शुक्रवारी ठरणार, बीसीसीआय निवडणूक अधिकाऱ्यांच्या छाननी प्रक्रियेकडे लक्ष

Goa Weather Update: राज्यात मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

"दक्षिण गोव्‍यात येण्‍याची चूक करू नका..." टॅक्‍सीवाल्‍यांनी केली दमदाटी, अहमदाबाद येथील महिलेनं व्‍हिडिओद्वारे व्‍हायरल केली व्यथा Watch Video

Mhaje Ghar Yojana: अमित शहा उघडणार 'माझे घर'चे द्वार, 50 टक्‍के गोमंतकीयांना मिळणार लाभ - मुख्‍यमंत्री

Mopa Airport: मोपा विमानतळाबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्याला गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या VIDEO

SCROLL FOR NEXT