Craig Williams
Craig Williams Dainik Gomantak
क्रीडा

ICC T20: 'या' संघाचा खेळाडू क्रिकेट खेळण्याबरोबर करतो विमा कंपनीत काम

दैनिक गोमन्तक

नामिबिया (Namibia) सध्या ICC T20 विश्वचषक-2021 (ICC T20 World Cup-2021) मध्ये सहभागी झाला आहे. परंतु नामिबीयाचा संघ सुपर-12 मध्ये क्रमवारीनुसार सर्वात शेवटी आहे. या संघात असा एक खेळाडू आहे जो दुहेरी भूमिका बजावत आहे. तो क्रिकेटही खेळतो आणि नोकरीही करतो. क्रेग विल्यम्स (Craig Williams) असे या खेळाडूचे नाव आहे. नामिबियाचा सामना रविवारी अफगाणिस्तानशी (Afghanistan) होणार आहे. या सामन्यात विल्यम्सच्या नजरा आपल्या संघाच्या विजयावर असतील. दरम्यान विल्यम्सने शनिवारी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'माझे मुख्य काम काहीतरी वेगळे आहे. मी दिवसा क्रिकेट खेळतो आणि रात्री एका विमा कंपनीत काम करतो.'

तो पुढे म्हणाला, "कोणीतरी मला चुकीचे सिद्ध करावे अशी माझी इच्छा आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे या विश्वचषकात मी एकमेव व्यक्ती आहे, जो रात्री घरी गेल्यानंतर विमा कंपन्यांसाठी विमा अहवाल लिहितो." नामिबियाकडे केवळ 18 पूर्णवेळ खेळाडू आहेत. सुपर-12 फेरीत नामिबीयाने स्कॉटलंडचा (Scotland) पराभव केला. आता नामिबीयाला अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंडसारख्या संघांचा सामना करावा लागणार आहे.

निवृत्तीतून परतणे

2018 मध्ये विल्यम्सने क्रिकेटला अलविदा केला होता. त्याला आपल्या कामात लक्ष घालायचे होते. परंतु प्रशिक्षक पियरे डी ब्रुइन (Pierre de Bruyne) यांनी त्याला पुन्हा क्रिकेटमध्ये आणले. तो एक इनडोअर क्रिकेट सेंटर, क्रिकेट शॉप आणि कनिष्ठ अकादमी चालवतो. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला विल्यम्स म्हणाला, मी व्यवसायासाठी खूप काम करतो. नामिबियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणे हा माझ्यासाठी गौरवाचे आहे. मी याकडे छंद म्हणून पाहत नाही कारण मला वाटते की, आम्ही प्रोफेन्शल खेळाडू आहोत. मी क्रिकेट खेळताना त्याचा आनंद घेतो. परंतु मी यावर 100% अवलंबून नाही इतकेच आहे. मी इतर गोष्टी देखील करतो ज्या मला व्यस्त ठेवतात."

आगोदरही वर्ल्ड कप खेळलो

नामिबियाचा हा पहिलाच विश्वचषक नाही. 2003 मध्ये तो पहिल्यांदा विश्वचषक खेळला होता. हा विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया यांच्या संयुक्त यजमानपदावर खेळला गेला. नामिबियाने सहा गट सामने खेळले मात्र दुर्देवाने सर्व सामने गमावले. नामिबिया 2007 मध्ये ICC च्या हाई परफॉर्मैंस कार्यक्रमाचा भाग बनला. मात्र त्याला वर्ल्डकपमध्ये प्रवेश मिळवता येत नव्हता. परंतु त्याने आपल्या मेहनतीने ICC T20 विश्वचषक-2021 साठी पात्रता मिळवली आणि नंतर पहिल्या फेरीचा अडथळा पार करत सुपर-12 मध्येही पोहोचला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT