क्रीडा

Wanindu Hasaranga Suspended: वानिंदू हसरंगाला मोठा झटका, ICC नं केलं सस्पेंड; अफगाणिस्तानच्या खेळाडूलाही शिक्षा

Sri Lanka Cricket Team Captain Wanindu Hasaranga: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शनिवारी संध्याकाळी मोठा निर्णय घेतला. श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार वानिंदू हसरंगा याला निलंबित करण्यात आले.

Manish Jadhav

ICC Suspended Sri Lanka Cricket Team Captain Wanindu Hasaranga: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शनिवारी संध्याकाळी मोठा निर्णय घेतला. श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार वानिंदू हसरंगा याला निलंबित करण्यात आले. अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या टी-20 मालिकेदरम्यान घडलेल्या एका घटनेबाबत ही शिक्षा देण्यात आली आहे. इतकेच नाही तर आयसीसीने अफगाणिस्तानचा खेळाडू रहमानउल्ला गुरबाजलाही शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे, हसरंगाला पुढील दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. तर गुरबाजला मॅच फीचा दंड आणि डिमेरिट पॉइंट्सची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलायचे झाल्यास, वानिंदू हसरंगाचे एकूण डिमेरिट गुण 5 झाले आहेत. या कारणास्तव, नियमांनुसार, जर एखाद्या खेळाडूला गेल्या दोन वर्षांत पाच डिमेरिट गुण मिळाले, तर त्याला मॅच फीच्या 50 टक्के फी आणि दोन सामन्यांसाठी निलंबित केले जाते. विशेष म्हणजे, हसरंगाला आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.13 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले, यामध्ये जर एखाद्या खेळाडूने वैयक्तिकरित्या त्याच्या सपोर्ट स्टाफ, अम्पायर किंवा मॅच रेफरी यांच्याबद्दल चुकीचे शब्द उच्चारले तर त्याला दोषी ठरवले जाते.

दुसरीकडे, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना होता. त्या सामन्यात हसरंगा अम्पायर लिंडन हॅनिबल यांच्याकडे गेला आणि फुल टॉसला बॉलला नो बॉल दिल्यानं बरचं काही त्यांना बडबडला. या कारणामुळे तो दोषी ठरला. आता तो पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेच्या टी-20 मालिकेतील पहिले दोन सामने खेळू शकणार नाही.

रहमानउल्ला गुरबाजला शिक्षा का झाली?

आता अफगाणिस्तानचा स्टार फलंदाज रहमानउल्ला गुरबाजबद्दल बोलायचे झाल्यास, त्यालाही आयसीसीने शिक्षा दिली आहे. मात्र, त्याला मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तो आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 मध्ये दोषी आढळला. त्याने या संहितेच्या कलम 2.4 च्या नियमाचे उल्लंघन केले. यामध्येही अम्पायरचे न ऐकण्यासारख्या गोष्टी आहेत. यासाठी त्याला मॅच फीच्या दंडाव्यतिरिक्त 1 डिमेरिट पॉइंट देखील मिळाला. गेल्या दोन वर्षांतील त्याची ही दुसरी चूक असून त्याचे एकूण 2 डिमेरिट गुण झाले आहेत.

दरम्यान, गुरबाजच्या चुकीबद्दल बोलायचे झाल्यास, बॅटच्या ग्रीपशी छेडछाड केल्याबद्दल त्याला ही शिक्षा देण्यात आली आहे. यासाठी त्याला ताकीदही मिळाली होती, परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. या दोन्ही खेळाडूंनी आपापले आरोप स्वीकारले आहेत. त्याने सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी केलेले आरोप मान्य केले आहेत. या कारणास्तव, या प्रकरणावर आता कोणत्याही सुनावणीची आवश्यकता नाही. मैदानी अम्पायर लिंडन हॅनिबल आणि रवींद्र विमलासिरी यांनी ही तक्रार केली होती. तिसरे अम्पायर रुचिरा पल्लीगुरुगे आणि चौथे अम्पायर रॅनमोर मार्टिनेझ यांनीही ही तक्रार केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT