Wanindu Hasaranga: हसरंगाचा T20I मध्ये मोठा पराक्रम! 100 विकेट्स घेत मोडला दिग्गज मलिंगाचा विक्रम

Sri Lanka vs Afghanistan: श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स करण्याबरोबरच मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Sri Lanka Cricket
Sri Lanka CricketAFP

Wanindu Hasaranga complete 100 T20I wickets:

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान संघात सध्या टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना सोमवारी (19 फेब्रुवारी) डंबुलामध्ये खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंकेने 72 धावांनी विजय मिळवला. या सामन्यादरम्यान श्रीलंकचा कर्णधार वनिंदू हसरंगाने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात हसरंगाने गोलंदाजी करताना 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा 11 वा पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे, तर लसिथ मलिंगानंतरचा दुसराच श्रीलंकन गोलंदाज ठरला आहे.

इतकेच नाही, तर हसरंगाने 63 व्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात खेळताना 100 विकेट्सचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे तो सर्वात कमी सामन्यात 100 आंतरराष्ट्रीय टी20 विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे.

Sri Lanka Cricket
IND vs ENG: पदार्पणातच सर्फराजचं नाणं खणखणीत वाजलं, दोन अर्धशतकांसह मिळवलं गावसकरांच्या पंक्तीत स्थान

सर्वात कमी सामन्यात 100 आंतरराष्ट्रीय टी20 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत हसरंगाच्या पुढे या यादीत केवळ अफगाणिस्तानचा राशीद खान आहे. राशीदने 53 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 100 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.

मलिंगा या यादीत चौथ्या क्रमांकावर असून त्याने 76 सामन्यांत अशा कारनामा केला होता. तिसऱ्या क्रमांकावर आयर्लंडचा मार्क एडेर आहे. त्याने 72 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 100 विकेट्स घेतल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय पुरुष टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांत 100 विकेट्स घेणारे गोलंदाज

  • 53 सामने - राशीद खान

  • 63 सामने - वनिंदू हसरंगा

  • 72 सामने - मार्क एडेर

  • 76 सामने - लसिथ मलिंगा

  • 78 सामने - इश सोधी

Sri Lanka Cricket
IND vs ENG: 'आमच्या संघाकडे कुठेही जिंकण्याची क्षमता...', भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर खेळपट्टीबाबत रोहितचं मोठं भाष्य

श्रीलंकेचा विजय

सोमवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 187 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून सदिरा समरविक्रमाने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली.

तसेच अँजेलो मॅथ्युजने आक्रमक खेळत 22 चेंडूत 42 धावा केल्या, तर पाथम निसंका (25) आणि कुशल मेंडिस (23) यांनी सलामीला छोटेखानी खेळी केल्या. याशिवाय हसरंगाने फलंदाजीतही 22 धावांचे योगदान दिले.

अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी आणि अझमतुल्लाह ओमरझाई यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर अफगाणिस्तानला 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 17 षटकात सर्वबाद 115 धावाच करता आल्या. अफगाणिस्तानकडून करिम जनत (28) आणि मोहम्मद नबी (27)यांनाच 20 धावांचा टप्पा पार करता आला.

श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना अँजेलो मॅथ्यूज, बिनूरा फर्नांडो, वनिंदू हसरंगा आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच महिश तिक्षणा आणि दसून शनका यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com