World Cup 2023 Promo Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: 'इतिहास लिहिला जाणार अन् स्वप्न...', वर्ल्डकप प्रोमोचा सोशल मीडियावर धुमाकूळ

World Cup 2023: आयसीसीने वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Pranali Kodre

ICC Cricket World Cup 2023 promo : भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळवली जाणार आहे. क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला आता जवळपास दोनच महिने राहिले असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने प्रोमो रिलिज केला आहे.

या दोन मिनिटांच्या प्रोमोमध्ये भारतीय अभिनेता शाहरुख खानने कथन केले आहे. हा प्रोमो स्पर्धेच्या 'सर्व काही होण्यासाठी एका दिवस (All it takes is one day)' ब्रीदवाक्याभोवती फिरतो.

या प्रोमोला आयसीसीने कॅप्शन दिले आहे की 'वर्ल्डकप 2023 स्पर्धेत इतिहास लिहिला जाईल आणि स्वप्न साकारली जातील. एक दिवस हे होईल.' या प्रोमोमध्ये वेगवेगळ्या देशांच्या दिग्गजही दिसत आहेत.

आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा सहसंघमालक शाहरुख व्हिडिओमध्ये सांगतो, 'इतिहास घडवणे आणि इतिहास होणे यातील फरक म्हणजे एक दिवस (वनडे). जर्सी अंगावर चढताच त्या एका दिवशी छाती अभिमानाने फुलतील. जिद्दीने विजय मिळवले जातील, त्यादिवशी आठवणी कोरल्या जातील.'

'त्या एका दिवशी भीतीवर विजय मिळवला जाईल. त्यादिवशी शौर्य दाखवले जाईल. उच्च आनंदापासून अत्यंत निराशेपर्यंत त्या दिलशी सर्व भावना स्विकारल्या जातील.'

शाहरुख पुढे कथन करतो, 'मैदानात प्रतिस्पर्ध्यांची व्याख्या पुन्हा लिहिली जाईल. स्टँड्समधून पुन्हा आदर दिला जाईल. अब्जावधी लोकांच्या मनातून विश्वासाची शक्ती दिसेल. त्या एका दिवशी गाणी गायली जातील, नाचले जाईल आणि आश्चर्याने डोळे विस्फारतील. जेव्हा अखेर तो एक दिवस येईल, विजय अमर होईल.'

'हा वर्ल्डकप आहे, ज्यासाठी स्वप्न पाहिले जाते, ज्यासाठी मेहनत घेतली जाते, हे सर्व एक दिवस होते.'

वर्ल्डकपचा 46 दिवस रंगणार थरार

वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान एकूण 46 दिवस होणार असून या स्पर्धेत 48 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व 48 सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरांमध्ये होणार आहेत.

या स्पर्धेत भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स हे संघ सहभागी होणार आहेत.

भारतीय संघाचे 2023 वर्ल्डकपसाठी वेळापत्रक

  • 8 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

  • 11 ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

  • 15 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

  • 19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

  • 22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धरमशाला

  • 29 ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ

  • 2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, मुंबई

  • 5 नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

  • 11 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, बंगळुरू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT