India vs South Africa ICC
क्रीडा

IND vs SA: भारत-द. आफ्रिकन खेळाडूंमध्ये दिसला याराना, तर विराटने ग्राऊंडस्टाफचा दिवस बनवला खास, पाहा BTS Video

World Cup 2023 Video: आयसीसीने वर्ल्डकप 2023 मधील भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यानंतरचा BTS व्हिडिओ शेअर केला आहे.

Pranali Kodre

ICC shares BTS Video after India vs South Africa Match in ODI Cricket World Cup 2023:

भारतीय क्रिकेट संघाने रविवारी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाताला झालेल्या सामन्यात 243 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने गुणतालिकेतील अव्वल स्थान पक्के केले आहे.

दरम्यान, ईडन गार्डन्सवर पार पडलेला हा सामना दोन्ही संघांसाठी गुणतालिकेत वर्चस्व ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता, कारण या दोन्ही संघांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले होते.

अखेर भारताने सलग आठवा सामना जिंकत अव्वल स्थान काबीज केले. दक्षिण आफ्रिका ८ सामन्यांमधील 6 विजय आणि 2 पराभवांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तथापि, सामन्यात या दोन्ही संघातील खेळाडू आमने-सामने उभे ठाकले असले, तरी सामन्यानंतर मात्र त्यांच्यात मैत्रीचे वातावरण दिसले. आयसीसीने या सामन्यानंतरच बिहाइंड द सीन असा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की दोन्ही संघातील खेळाडू सामन्यानंतर एकमेकांशी हात मिळवत आहेत. तसेत त्यानंतर रिकी पाँटिंगनेही विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या. तसेच नंतर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांशी हसून-खेळून गप्पा मारताना दिसत आहेत.

त्याचबरोबर विराटने नंतर ग्राऊंड स्टाफ, स्टेडियममधील स्टाफबरोबर फोटोही काढत त्यांचा दिवस खास बनवला. विशेष गोष्ट अशी की रविवारी विराट त्याचा 35 वा वाढदिवस देखील साजरा करत होता.

विराटने या सामन्यात शतकी खेळीही केली. त्याचबरोबर नाबाद १०१ धावांची खेळी करत सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक ४९ शतकांची बरोबरीही केली.

तसेच विराट आणि श्रेयस अय्यर यांच्यात महत्त्वपूर्ण १३४ धावांची भागीदारीही झाली. श्रेयसने 87 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 77 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाग 326 धावांचा टप्पा गाठला.

दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडी, मार्को यान्सिन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि ताब्राईज शम्सी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 327 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 27.1 षटकात सर्वबाद 83 धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सिनने सर्वाधिक 14 धावा केल्या. रस्सी वॅन डर द्युसेन (13), कर्णधार तेंबा बाऊमा (11) आणि डेव्हिड मिलर (11) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: 'कॅश फॉर जॉब प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज नाही'; वाचा ठळक बातम्या

Cash For Job Scam: दोन सरकारी कर्मचाऱ्यांसह 33 जणांना अटक; राजकीय कनेक्शनबाबत गोवा पोलिसांनी केला महत्वाचा खुलासा

Goa Crime: चोरीची तक्रार केली म्हणून रेस्टॉरंट मालकाचा काढला काटा; सहा वर्षानंतर दोघांना जन्मठेप, 1 लाख दंड

Cash For Job प्रकरणात सत्तरीतील युवकाला अटक! डिचोलीतील पाचजणांकडून उकळले 21.5 लाख

Jaipur - Goa Flight: पर्यटकांसाठी खूशखबर! गुलाबी शहरातून गोव्यासाठी सुरु होणार आणखी एक फ्लाईट

SCROLL FOR NEXT