The Oval Pitch Dainik Gomantak
क्रीडा

WTC 2023 Final मध्ये पावसापेक्षाही 'या' गोष्टीचं ICC ला टेंशन, स्टेडियममध्ये तयार ठेवल्या दोन खेळपट्ट्या

कसोटी चॅम्पियनशीप फायनलसाठी आयसीसीने दोन खेळपट्ट्या तयार ठेवल्या आहेत.

Pranali Kodre

ICC prepares back-up pitch at The Oval for WTC 2023 Final: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून (7 जून) कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेतील अंतिम सामना सुरू होत आहे. हा सामना दक्षिण लंडनमधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ, तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही जोरदार तयारी केली आहे.

दरम्यान, या सामन्यासाठी आयसीसीने द ओव्हलवर मुख्य खेळपट्टी आणि एक पर्यायी खेळपट्टीही तयार केलेली आहेत. सध्या इंग्लंडमध्ये जस्ट स्टॉप ऑईलकडून आंदोलन केले जात आहे. ब्रिटीश सरकारने नवीन तेल, वायू आणि कोळसा प्रकल्पांसाठी सर्व परवाने रद्द करावीत अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

यापूर्वी आंदोलकांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड क्रिकेट संघाच्या बसलाही थांबवून ठेवले होते. इंग्लंड आणि आयर्लंड संघात जूनच्या पहिल्या आठवड्यात लॉर्ड्सवर एकमेव कसोटी सामना झाला होता.

यावेळी इंग्लंड संघाच्या बसला स्टेडियमवर जात असताना रस्त्यात आंदोलन सुरू असल्याने उशीर झाला होता. याबद्दल जॉनी बेअरस्टोने सोशल मीडियावर फोटोही शेअर केला होता.

दोन खेळपट्ट्या तयार

दरम्यान, याच आंदोलनाच्या भीतीने आयसीसीने दोन खेळपट्ट्या तयार ठेवल्या आहेत. कारण वाईटातील वाईट परिस्थितीत जर आंदोलकांनी कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात अडथळा आणला आणि मुख्य खेळपट्टी उघडली, तर दुसरी खेळपट्टी तयार असावी असा यामागील उद्देश आहे. तसेच या सामन्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान होणार असून 12 जून हा राखीव दिवस आहे.

अंतिम सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ -

  • भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक).

    राखीव खेळाडू - यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार आणि सुर्यकुमार यादव

  • ऑस्ट्रेलिया संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, नॅथन लायन, टॉड मर्फी, मायकेल नेसर, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर

    राखीव खेळाडू: मिचेल मार्श, मॅथ्यू रेनशॉ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT