Rohit Sharma's injury scare ahead of India vs Australia WTC 2023 final: कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धा गेली दोन वर्षे सुरू होती. आता या स्पर्धेचा अंतिम सामना बुधवारपासून (7 जून) सुरु होत आहे. अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने येणार आहेत. हा अंतिम सामना इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे.
दरम्यान, या सामन्याला एक दिवसच बाकी असताना भारतीय क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांचे खेळाडू गेल्या काही दिवसांपासून ओव्हलवर कसून सराव करत आहे. अशाच अंतिम सामन्याच्या एक दिवस आधीच्या सराव सत्रात रोहितच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली.
दुखापतीनंतर तो अंगठ्याला मलमपट्टी बांधतानाही दिसला. तसेच त्याने लगेचच सराव थांबवला नाही, मात्र नंतर आणखी जोखीम न पत्करता सराव सत्र अर्धवट सोडून परतला. त्याचबरोबर त्याने नंतर अंगठ्याला बांधलेली पट्टीही काढली होती. आता त्याची ही दुखापत किती गंभीर आहे, याबद्दल अद्याप बीसीसीआयकडून माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, भारतीय संघ याआधीच काही प्रमुख खेळाडूंच्या दुखातीचा सामना करत आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाजल ऋषभ पंत गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्य गंभीर कार अपघातामुळे झालेल्या दुखापतींमधून सावरत आहे, तर श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह पाठीच्या शस्त्रक्रियानंतर त्यातून सावरत आहेत. याशिवाय केएल राहुलच्या मांडीवरही शस्त्रक्रिया झाली आहे.
कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळण्याची भारताची दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2019-21 दरम्यान कसोटी चॅम्पियनशीपचे पहिले पर्व खेळवण्यात आले होते, त्या पर्वातही भारताने अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. मात्र भारताला अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक).
राखीव खेळाडू - यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार आणि सुर्यकुमार यादव
ऑस्ट्रेलिया संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, नॅथन लायन, टॉड मर्फी, मायकेल नेसर, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर
राखीव खेळाडू: मिचेल मार्श, मॅथ्यू रेनशॉ
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.