ICC ODI World Cup 2027 Dainik Gomantak
क्रीडा

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

World Cup 2027 starting date: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 साठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Sameer Amunekar

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 साठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे या यजमान देशांनी स्पर्धेसाठी आपल्या स्टेडियम्स आणि इतर सुविधांच्या तयारीला सुरुवात केली आहे. आता या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबतही हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. स्पर्धेची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नसली, तरी एका अहवालातून संभाव्य सुरुवातीची तारीख आणि अंतिम सामन्याची तारीख समोर आली आहे.

२ ऑक्टोबरला होऊ शकते वर्ल्ड कपची सुरुवात

क्रिकबझच्या अहवालानुसार, २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपला २ ऑक्टोबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. या तारखेचा भारताशी विशेष संबंध आहे, कारण २ ऑक्टोबर हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिन आहे. दक्षिण आफ्रिकेचा महात्मा गांधींच्या जीवनाशी ऐतिहासिक संबंध असल्याने या दिवशी स्पर्धेची सुरुवात करण्याचा विचार केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

महात्मा गांधींनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ दक्षिण आफ्रिकेत घालवला होता. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी वर्ल्ड कपला सुरुवात करण्याची कल्पना दक्षिण आफ्रिकेसाठी विशेष महत्त्वाची ठरू शकते. यामुळे आगामी विश्वचषकाचे भारताशीही एक भावनिक आणि ऐतिहासिक कनेक्शन निर्माण होईल.

२१ नोव्हेंबरला फायनल होण्याची शक्यता

स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबतही एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, २१ नोव्हेंबर २०२७ रोजी वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो. मात्र, या तारखांवर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.

२०२३ मध्ये भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव करत सहाव्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सध्या या स्पर्धेचा विद्यमान विजेता आहे.

आतापर्यंत १० संघांची जागा निश्चित

२०२७ च्या वर्ल्ड कपसाठी आतापर्यंत १० संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे. यजमान असल्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेला थेट प्रवेश मिळाला आहे. त्यांच्यासोबत भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांनीही पात्रता मिळवली आहे.

या संघांना जागतिक क्रमवारीतील स्थानाच्या आधारे थेट प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे स्पर्धेतील काही प्रमुख संघांचे स्थान आधीच निश्चित झाले आहे.

वेस्ट इंडिजला क्वालिफायरचा सामना करावा लागणार

दोन वेळा वनडे वर्ल्ड कप जिंकलेल्या वेस्ट इंडिजला मात्र यावेळी थेट मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळालेला नाही. त्यांना वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्यासाठी पात्रता फेरीतून मार्ग काढावा लागणार आहे. आयर्लंडलाही क्वालिफायरमध्ये खेळावे लागणार आहे.

त्यामुळे २०२७ च्या विश्वचषकासाठी उर्वरित संघांची शर्यतही चुरशीची होणार आहे. यजमान देशांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारतासह जगातील आघाडीचे संघ सहभागी होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आता अधिकृत वेळापत्रकाकडे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT