Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

ICC ODI Rankings: वनडे क्रमवारीत टीम इंडियाला मोठा झटका, पाकिस्तानने मारली बाजी!

ICC ODI Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गुरुवारी वनडे रॅंकिंग जाहीर केली, ज्यामध्ये मोठा बदल झाला आहे.

Manish Jadhav

ICC ODI Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गुरुवारी वनडे रॅंकिंग जाहीर केली, ज्यामध्ये मोठा बदल झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ 118 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर पाकिस्तान संघाने टीम इंडियाला मागे टाकून आयसीसी वनडे रॅंकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. याआधी, पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर होता. मात्र आता तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर घसरली

मात्र यापूर्वी, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या टीम इंडियाला (Team India) मोठा फटका बसला आहे. पाकिस्तान संघाने नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका 4-1 ने जिंकली. ज्याचा त्याला या वनडे रॅंकिंगमध्ये फायदा झाला.

दुसरीकडे, भारतीय संघाने एका महिन्याहून अधिक काळ एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, त्यामुळे पाकिस्तान संघाला वनडे रॅंकिंगमध्ये फायदा मिळणे साहजिक आहे.

भारताचे 115, पाकिस्तानचे 116 गुण आहेत

भारत (India) आणि पाकिस्तान यांच्यात रेटिंग पॉइंटचे फारच कमी अंतर आहे. वार्षिक अद्ययावत क्रमवारीत, पाकिस्तानचे 116 रेटिंग गुण आहेत, तर भारताचे 115 रेटिंग गुण आहेत.

ICC वार्षिक एकदिवसीय क्रमवारीतील शीर्ष पाच संघ

ऑस्ट्रेलिया - 118

पाकिस्तान - 116

भारत – 115

न्यूझीलंड - 104

ENG-101

एकदिवसीय विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले जाईल

वास्तविक, या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. आयपीएलनंतर टीम इंडिया या मोठ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

याआधी काही एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. यंदाचा आशिया चषकही एकदिवसीय स्वरुपात खेळवला जाणार आहे. अशा स्थितीत यंदाच्या वनडे क्रमवारीत बरेच बदल पाहायला मिळू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT