World Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: उद्घाटन समारंभ रद्द, पण भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी होणार विशेष सोहळा?

Opening Ceremony: वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup opening ceremony cancelled:

भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे बिगूल वाजले असून 5 ऑक्टोबर रोजी पहिला सामना खेळला जाणार आहे. अहमदाबादला होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी बुधवारी (4 ऑक्टोबर) या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, हा सोहळ रद्द करण्यात आल्याचे आता समोर आले आहे.

दरम्यान, याआधी अशी चर्चा होती की अनेक मोठमोठ्या कलाकारांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होईल, मात्र आता हा सोहळा रद्द झाला आहे. मात्र, सोहळा रद्द होण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

टाईम्स ऑफ इंडियाला एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार वर्ल्डकपच्या उद्घाटन सोहळ्याची योजना आखण्यात आली नव्हती.' तसेच सुत्राने सांगितले की 'आयपीएलच्या बाबतीत सामना संध्याकाळी असल्याने छोटा सोहळा आयोजित केला जाऊ शकतो, पण वर्ल्डकपमध्ये सामना दुपारी सुरू होणार आहे.'

दरम्यान, अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी बीसीसीआय एक छोटा सोहळा अहमदाबादला ठेवण्याची शक्यता आहे. पण अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कॅप्टन्स डे

दरम्यान, उद्घाटन सोहळा जरी रद्द झाला असला तरी कॅप्टन्स डे आयोजित करण्यात आला आहे. कॅप्टन्स डे म्हणजे स्पर्धेपूर्वी सहभागी संघांचे सर्व कर्णधार एकत्र येऊन मीडियाशी संवाद साधतात. तसेच त्यांचे फोटोसेशनही होते. त्यामुळे सर्व सहभागी 10 संघांचे कर्णधार 4 ऑक्टोबर रोजी अहमदाबादला उपस्थित आहेत.

यावेळी त्यांच्याशी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि ओएन मॉर्गन यांनी संवाद साधला. त्यानंतर सर्व 10 कर्णधारांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

४६ दिवस अन् ४८ सामने

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स हे 10 संघ सहभागी झाले आहेत. या 10 संघात मिळून 46 दिवसात 48 सामने खेळवण्यात येणार आहेत.

भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे रंगणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: नागेशीत 'गोविंदा रे गोपाळा'च्या गजरात दही हंडी साजरी

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT