Sachin Tendulkar
Sachin TendulkarDainik Gomantak

World Cup 2023: आयसीसीकडून सचिन तेंडुलकरचा मोठा सन्मान, बनला वर्ल्ड कपचा ‘Ambassador’

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला आयसीसीने मोठा सन्मान दिला आहे.
Published on

Sachin Tendulkar: क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला आयसीसीने मोठा सन्मान दिला आहे. आयसीसीने तेंडुलकरला 2023 वर्ल्डकपसाठी जागतिक राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. भारतरत्न पुरस्कार विजेत्या तेंडुलकरला वर्ल्डकप अॅम्बेसेडर म्हणून नामांकन मिळाल्याने चाहते खूप खूश आहेत.

सचिन वर्ल्डकप ट्रॉफीसह स्पर्धेच्या उद्घाटनाची घोषणा करणार

सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) क्रिकेट जगताचा देव म्हटले जाते. अशा परिस्थितीत त्याला 2023 च्या वर्ल्डकपचा अॅम्बेसेडर बनवणे हा योग्य निर्णय मानला जात आहे. भारतीय संघाने शेवटचा वर्ल्डकप जिंकला तेव्हा सचिनही संघाचा एक भाग होता.

सचिननेही संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. 12 वर्षांपूर्वी भारताने हे विजेतेपद पटकावले होते. आता नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात सचिन वर्ल्डकप ट्रॉफीसह स्पर्धेच्या उद्घाटनाची घोषणा करेल.

Sachin Tendulkar
World Cup 2023: रोहित शर्मा विश्वविजेता कर्णधार होणार? प्रसिद्ध ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबोंची भविष्यवाणी

दरम्यान, वर्ल्डकपमध्ये सचिनने अनेक विक्रम केले आहेत. सर्वाधिक वर्ल्डकप सामने खेळण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. याशिवाय सचिनने वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावाही केल्या आहेत.

आतापर्यंत जगात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. वर्ल्डकपमध्ये भारतीय संघासाठी सचिनने दिलेले योगदान विसरता येणार नाही, हे यावरुन स्पष्ट होते. यामुळेच जेव्हा जेव्हा आयसीसी किंवा बीसीसीआयला (BCCI) संधी मिळते तेव्हा ते सचिनला सर्वोच्च सन्मान देतात.

Sachin Tendulkar
World Cup 2023: भारताचा माजी कर्णधार वर्ल्ड कपमध्ये करणार अफगाण टीमला मार्गदर्शन!

कोहली सचिनचा विक्रम मोडू शकतो

मात्र, या वर्ल्डकपमध्ये सचिनचे काही विक्रम मोडीत निघू शकतात. भारताचा विस्फोटक फलंदाज शुभमन गिल सध्या सचिनचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडू शकतो, असा अंदाज अनेक दिग्गज वर्तवत आहेत.

याशिवाय, विराट कोहली सचिनचा एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वाधिक शतकांचा विक्रमही मोडू शकतो. विराटने वनडेमध्ये आतापर्यंत 47 शतके झळकावली आहेत.

सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 49 शतके झळकावली आहेत, तर कोहलीला त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत शतके करण्याच्या बाबतीत सचिनला मागे सोडण्याची संधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com