Team India Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: वानखेडेवर श्रीलंकेने जिंकला टॉस, अशी आहे भारताची 'प्लेइंग-11'

India vs Sri Lanka: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताविरुद्ध श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Sri Lanka at Wankhede Stadium in Mumbai:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी भारत विरुद्ध श्रीलंका संघात सामना होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, नाणेफेकीवेळी भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले की नाणेफेक हरली असली, तरी त्यांना प्रथम फलंदाजीच करायची होती आणि श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यांना प्रथम फलंदाजीचीच संधी मिळणार आहे. रोहितने आशा व्यक्त केली आहे की दुसऱ्या डावात भारताच्या वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल.

या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही, तर श्रीलंकेने धनंजय डी सिल्वाच्या जागेवर दुशन हेमंथाला संधी दिली आहे.

तथापि, हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. भारताने या सामन्यात विजय मिळवल्यास ते उपांत्य सामन्यातील स्थान पक्के करतील, तर श्रीलंकेला आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी या सामन्यात विजय गरजेचाच आहे.

विशेष म्हणजे 12 वर्षांपूर्वी म्हणजे 2 एप्रिल 2011 रोजी भारत आणि श्रीलंका संघात वानखेडे स्टेडियमवरच वर्ल्डकप 2011 स्पर्धेचा अंतिम सामना झाला होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता आणि दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले होते.

या सामन्यानंतर पुन्हा एकदा हे दोन संघच वानखेडे स्टेडियमवर वर्ल्डकपचा सामना खेळण्यासाठी आमने-सामने आले आहेत.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

  • श्रीलंका - पाथम निसंका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशन हेमंथा, महिश तिक्षणा, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cabinet Decision: खाण व्यवसायाला दिलासा! ट्रकसाठी रस्ता कर सवलत आता 2027 पर्यंत वाढवली; वाचा गोवा मंत्रिमंडळाचे तीन महत्त्वाचे निर्णय

Pooja Naik: 'पूजा नाईकच्या आरोपांना पुरावा मिळेना', DGP आलोक कुमार यांचा खुलासा; प्रकरणाचा तपास थंडावणार?

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

DLF Housing Project: 'दाबोळी टेकडीवरील एकाही झाडाला हात लावू नका', कोर्टाची 'डीएलएफ'ला ताकीद

SCROLL FOR NEXT