IND vs SL Head To Head: टीम इंडिया मारणार वानखेडेचं मैदान? भारतविरुद्ध श्रीलंका हेड टू हेड रेकॉर्ड पाहून तुम्हीही म्हणाल...

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया शानदार कामगिरी करत आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया शानदार कामगिरी करत आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 6 सामने खेळले असून ते सर्व जिंकले आहेत. टीम इंडियाला गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध सामना खेळायचा आहे. अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याची टीम इंडियाला पहिली संधी मिळेल. सहा सामन्यांत अपराजित राहिलेल्या भारताला 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी त्यांच्या उर्वरित तीन सामन्यांपैकी किमान एक सामना जिंकणे आवश्यक आहे. जर भारत श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवण्यात यशस्वी ठरला तर तो उपांत्य फेरीत खेळणार हे निश्चित होईल.

भारताविरुद्ध श्रीलंका हेड टू हेड रेकॉर्ड

दरम्यान, एकेकाळी श्रीलंकेची गणना जगातील बलाढ्य संघात केली जात होती. त्यांच्याकडे उत्तम गोलंदाज आणि फलंदाज होते. ते भारतालाही तोडीस-तोड टक्कर देत असे. पण आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. श्रीलंकेचा संघ भारताच्या जवळपासही नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 167 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने 98 सामने जिंकले असून श्रीलंकेने 57 जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला तर 11 सामन्यांचा निकाल लागला नाही. गेल्या 10 एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने 9 सामने जिंकले आहेत.

Team India
World Cup 2023: रॅसी व्हॅन डेर डुसेन आणि क्विंटन डी कॉकचे तूफानी 'शतक', आफ्रिकेच्या 350+ धावा

ODI मध्ये आमने-सामने

एकूण एकदिवसीय: 167

भारत 98 सामने जिंकला

श्रीलंका 57 सामने जिंकला

टाय: 01

निकाल न लागलेले 11 सामने

विश्वचषकात तुल्यबळ स्पर्धा

विश्वचषकाबद्दल बोलायचे झाल्यास, श्रीलंकेचा संघ भारताला तोडीस-तोड टक्कर देतो. 1979 मध्ये श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता. श्रीलंकेच्या त्या विजयानंतर 1996 मध्ये उपांत्य फेरीत श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतर भारत स्पर्धेतून बाहेर पडला होता. 2007 च्या विश्वचषकात श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता. दुसरीकडे, भारताने 2011 मध्ये श्रीलंकेला हरवून विश्वचषक जिंकला होता.

Team India
World Cup 2023: डी कॉकची शानदार कामगिरी; एका झटक्यात मोडला कॅलिस-डिव्हिलियर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड!

विश्वचषकात भारतविरुद्ध श्रीलंका

एकूण 09 सामने

भारत 4 जिंकला

श्रीलंका 4 जिंकला

निकाल न लागलेला 1 सामना

Team India
World Cup 2023: पाकिस्तान IN, बांगलादेश Out! बाबर सेनेच्या विजयाने बदलला Points Table चा खेळ

आशिया कपमध्ये 50 धावांवर ऑलआऊट झाला होता

गेल्या महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषक 2023 च्या विजेतेपदाचा सामना झाला होता. त्या सामन्यात भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा डाव अवघ्या 50 धावांवर ऑलआऊट झाला होता. जानेवारीत भारताने श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव केला होता. वनडे इतिहासातील धावांच्या बाबतीतही हा सर्वात मोठा पराभव ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com