IND vs SL: वर्ल्डकप, मुंबई अन् भारत वि. श्रीलंका! चाहत्यांच्या डोळ्यासमोर तरळल्या 12 वर्षांपूर्वीच्या आठवणी

World Cup 2023: गुरुवारी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईत सामना रंगणार आहे.
India vs Sri Lanka
India vs Sri LankaDainik Gomantak

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Sri Lanka at Wankhede Stadium in Mumbai:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी भारत विरुद्ध श्रीलंका संघात सामना होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

त्यामुळे चाहत्यांना मुंबईत पुन्हा एकदा भारत आणि श्रीलंका यांच्यात वर्ल्डकपचा सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्याने अनेकांसाठी 12 वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

कारण 12 वर्षांपूर्वी म्हणजे 2 एप्रिल 2011 रोजी भारत आणि श्रीलंका संघात वानखेडे स्टेडियमवरच वर्ल्डकप 2011 स्पर्धेचा अंतिम सामना झाला होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता आणि दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले होते.

India vs Sri Lanka
World Cup 2023: भारताने इंग्लंडला हरवताच चाहत्यांना आठवला 'लगान', भन्नाट मीम्स व्हायरल

त्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. माहेला जयवर्धनेने श्रीलंकेकडून शतकी खेळी केली. त्याने 88 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकन संघाने 50 षटकात 6 बाद 274 धावा केल्या होत्या.

त्यानंतर 275 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या सुरुवातीच्या विकेट्स लवकर गेल्या होत्या. पण नंतर गौतम गंभीर आणि एमएस धोनी यांच्यात 109 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. गंभीर 97 धावांवर बाद झाला. त्यानंतर एमएस धोनीने युवराज सिंगला साथीला घेत भारताला विजय मिळवून दिला होता. धोनीने नाबाद 91 धावांची खेळी केली होती.

तो सामना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा अखेरचा वर्ल्डकप सामना होता. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी त्याला खांद्यावर घेऊन मैदानाचा फेरफटका मारला होता.

विशेष म्हणजे या सामन्याच्या 12 वर्षांनंतर वानखेडे स्टेडियमवर 1 नोव्हेंबर 2023 रोजी सचिनच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

India vs Sri Lanka
World Cup 2023: श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11, 'या' खेळाडूंना संधी मिळेल का?

दरम्यान, आता पुन्हा एकदा 2011 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भिडलेले हे दोन संघ आमने-सामने येणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील भारत-श्रीलंका सामन्यासाठी संघ -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

  • श्रीलंका - पाथम निसंका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस(यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, दुष्मंथा चमीरा, महिश तिक्षणा, कसुन रजिथा, दिलशान मदुशंका, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेलालागे, दुशन हेमंता, कुशल परेरा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com