Rohit Sharma ICC
क्रीडा

World Cup 2023: 'आम्ही काहीही केलं तरी...', नेदरलँड्सविरुद्ध टॉस जिंकून रोहितचं मोठं भाष्य

India vs Netherlands: वर्ल्डकप 2023 मधील अखेरच्या साखळी सामन्यात भारताने नेदरलँड्सविरुद्ध टॉस जिंकला आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Netherlands, Playing XI:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना रविवारी (12 नोव्हेंबर) खेळवला जात आहे. हा सामना भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच नेदरलँड्सनेही त्यांच्या संघात बदल केलेला नाही. त्यामुळे दोन्ही संघ याआधीच्या सामन्यात खेळवलेल्या 11 खेळाडूंनाच या सामन्यातही खेळवणार आहेत.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याबद्दल रोहित शर्मा म्हणाला, 'या निर्णयामागे काही विशेष कारण नाही. आम्ही जरी आधी फलंदाजी किंवा गोलंदाजी केली, तरी आम्ही खूप चांगली कामगिरी केली आहे. आज आमच्याकडे चांगले खेळण्याची आणखी एक संधी आहे. आम्ही ज्याप्रकारे स्पर्धा खेळलो आहे, त्याने मी खूप खूश आहे. ज्या खेळाडूंनी वेगवेगळ्या वेळी जबाबदारी घेत कामगिरी केली, त्यांना सलाम.'

भारताने आत्तापर्यंत या स्पर्धेत 5 सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी केली आहे 3 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी केली आहे. या सर्व सामन्यात विजय मिळवला आहे.

भारताने आत्तापर्यंत 8 पैकी 8 साखळी सामने जिंकल असून उपांत्य फेरीत यापूर्वीच प्रवेश केला आहे, तर नेदरलँड्सने 8 पैकी 2 सामने जिंकले आहेत, तर 6 सामने पराभूत झाले आहेत. सध्या ते गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहेत.

दरम्यान, आता दोन्ही संघ रविवारी अखेरचा साखळी सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. हा नेदरलँड्सचा स्पर्धेतील अखेरचा सामनाही आहे.

असे आहेत दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

  • नेदरलँड्स - वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, सायब्रँड अँजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), बास डी लीड, तेजा निदामानुरु, लोगान वॅन बीक, रोएलॉफ वॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल वॅन मीकरेन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT