Hardik Pandya 
क्रीडा

IND vs BAN: चालू सामन्यात टीम इंडियाला जबर धक्का! हार्दिक मैदानातून बाहेर, BCCI ची मोठी अपडेट

World Cup 2023: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या गोलंदाजी करताना जखमी झाला असून त्याच्याबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Bangladesh, Hardik Pandya Injury :

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील 17 वा सामना भारत आणि बांगलादेश संघात होत आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर सुरु आहे. मात्र, हा सामना सुरू असतानाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला मैदानातून बाहेरही जावे लागले असून त्याबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार सध्या हार्दिकच्या दुखापतीवर उपचार सुरू असून त्याच्या पायाचे स्कॅन करण्यात येणार आहे.

हार्दिकला कशी झाली दुखापत

झाले असे की या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या बांगलादेशकडून तान्झिद हसन आणि लिटन दास सलामीला फलंदाजी करत होते. त्यांनी चांगली सुरुवात दिली होती. त्यावेळी 9 व्या षटकात हार्दिक गोलंदाजीसाठी आला. त्याच्या या षटकात पहिल्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर लिटन दासने चौकार ठोकले.

दरम्यान तिसऱ्या चेंडूवर लिटनने सरळ फटका खेळला होता. त्यावर हार्दिकने पायाने तो चेंडू आडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात तो घसरून खाली पडला आणि जखमी झाला. यावेळी त्याला नीट चालता येत नव्हते.

त्यावेळी भारतीय संघाची मेडिकल टीम मैदानात आली आणि त्यांनी त्याच्यावर उपचार केले. मात्र, त्यानंतर हार्दिकला मैदानाबाहेर जावे लागले. त्याच्या 9 व्या षटकातील उर्वरित तीन चेंडू विराट कोहलीने टाकले. विराटने उर्वरित 3 चेंडूत 2 धावा दिल्या. दरम्यान, विराट तब्बल 6 वर्षांनी वनडेमध्ये गोलंदाजी करताना दिसला.

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात बांगलादेशचे नेतृत्व शाकिब अल हसन ऐवजी नजमुल हुसैन शान्तो करतोय. शाकिबला दुखापत झाल्याने तो या सामन्यातून बाहेर आहे.

तसेच बांगलादेशने प्लेइंग इलेव्हनमध्ये शाकिब ऐवजी नसुम अहमदला संधी देण्यात आली आहे. तसेच तस्किन अहमद ऐवजी हसन मेहमुदला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर भारतीय संघाने मात्र, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

  • बांगलादेश - लिटन दास, तन्झीद हसन, नजमुल हुसेन शान्तो (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT