IND vs BAN: बांगलादेशला हलक्यात घेऊन चालणार नाही! यापूर्वीही भारताला दिलेत पराभवाचे मोठे धक्के

World Cup 2023: भारत आणि बांगलादेश संघात पुण्यात गुरुवारी वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा सामना होणार आहे.
Asia Cup 2023, Super Four, India vs Bangladesh | Shakib Al Hasan
Asia Cup 2023, Super Four, India vs Bangladesh | Shakib Al HasanDainik Gomantak
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Bangladesh:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश संघात गुरुवारी सामना होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे.

भारताचा आणि बांगलादेशचा हा या स्पर्धेतील हा चौथा सामना आहे. दरम्यान या स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजीत राहिला आहे, तर बांगलादेशने 3 पैकी एक सामना जिंकला आहे, तर 2 सामने पराभूत झाले आहेत.

असे असले तरी बांगलादेशला हलक्यात घेणे भारतासाठी महागात पडू शकते. त्यातही भारतासाठी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनला रोखणे मोठे आव्हान असणार आहे. शाकिबने बांगलादेशसाठी मोलाची कामगिरी आत्तापर्यंत बजावली आहे.

Asia Cup 2023, Super Four, India vs Bangladesh | Shakib Al Hasan
World Cup 2023: पुणे, वर्ल्डकप अन् मोठा उलटफेर! कहाणी 27 वर्षांपूर्वीच्या सामन्याची

बांगलादेशने महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये बऱ्याचदा भारतासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. डिसेंबर 2022 मध्ये भारताला बांगलादेशने मायदेशात वनडे मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभूत केले आहे. तसेच वर्ल्डकपपूर्वी झालेल्या आशिया चषक 2023 स्पर्धेतही बांगलादेशने भारताला पराभवाचा धक्का दिला आहे.

आशिया चषक 2023 स्पर्धेत सुपर फोर फेरीत बांगलादेशने भारताला 6 धावांनी पराभूत केले होते. त्या सामन्यात शाकिबने फलंदाजी करताना 80 धावांची खेळी केली होती.

तसेच तोहिद हृदोयने 54 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या नासूम अहमदने 44 धावा केल्या होत्या. त्यामुळे बांगलादेशने 265 धावा उभारल्या होत्या.

Asia Cup 2023, Super Four, India vs Bangladesh | Shakib Al Hasan
IND vs PAK: 'बेस्ट फिल्डर ठरलाय...' अन् अचानक भारतीय खेळाडू करू लागले KL राहुलला चिअर

त्या सामन्यात शार्दुल ठाकूरने भारतासाठी 3 विकेट्स घेतलेल्या. त्यानंतर 266 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 49.5 षटकात सर्वबाद 259 धावा करता आल्या होत्या.

त्या सामन्यात शुभमन गिलने 121 धावांची खेळी केलेली, मात्र अन्य कोणाला खास काही करता आले नव्हते. त्या सामन्यात मुस्तफिजूरने 3 विकेट्स घेतलेल्या. तसेच शाकिबनेही 1 विकेट घेतलेली.

याशिवाय 2007 वनडे वर्ल्डकपमध्येही भारताला बांगलादेशने पराभवाचा जोरदार धक्का दिला होता. त्या सामन्यात बांगलादेशने भारताला 49.3 षटकात 191 धावांवर सर्वबाद केले होते. तसेच 192 धावांचे आव्हान 48.3 षटकात पूर्ण केले होते.

त्या सामन्यातही बांगलादेशकडून मुस्तफिकूर रहिम (56), तमिम इक्बाल (51) आणि शाकिब अल हसन (53) यांनी अर्धशतके झळकावली होती. तो सामना बांगलादेशने 5 विकेट्सने जिंकला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com