Jo Root - Sam Curran X/englandcricket
क्रीडा

World Cup 2023: जो रुटची फिल्डिंगमध्ये कमाल! मोहम्मद कैफच्या 20 वर्षे जुन्या विक्रमाशी केली बरोबरी

Joe Root Record: वर्ल्डकप 2023 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना जो रुटने फिल्डिंगमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, England vs Afghanistan, Joe Root 4 Catches Record:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी 13 वा सामना इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान संघात सामना होत आहे. अरुण जेटली स्टेडियमवर होत असेलल्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडला 285 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंडचा क्रिकेटपटू जो रुटने एक खास विक्रम केला आहे.

रुट एक चांगला फलंदाजच नाही, तर एक चांगला क्षेत्ररक्षकही आहे. हेच त्याने या सामन्यातही दाखवले. त्याने या सामन्यात 4 झेल घेतले. त्याने इब्राहिम झाद्रान, मोहम्मद नबी, राशिद खान आणि मुजीब-उर-रेहमान या खेळाडूंचे झेल घेतले.

त्यामुळे तो वर्ल्डकप स्पर्धेत एकाच सामन्यात सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक ठरला आहे. त्याने मोहम्मद कैफ, सौम्य सरकार, उमर अकमल आणि ख्रिस वोक्स यांची बरोबरी केली आहे.

या सर्वांनी देखील वर्ल्डकप सामन्यात 4 झेल घेण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम सर्वातआधी मोहम्मद कैफने 2003 च्या वर्ल्डकपमध्ये केला आहे. त्याने जोहान्सबर्गला झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 4 झेल घेतले होते.

त्यानंतर बांगलादेशच्या सौम्य सरकारने स्कॉटलंडविरुद्ध 2015 सालच्या वर्ल्डकपमध्ये 4 झेल घेतलेले. तसेच उमर अकमलने आयर्लंडविरुद्ध 2015 सालच्याच वर्ल्डकपमध्ये 4 झेल घेतले आहेत. त्याचबरोबर इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने पाकिस्तानविरुद्ध 2019 वर्ल्डकपमध्ये 4 झेल घेतले होते.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पण अफगाणिस्तानने चांगली सुरुवात केली. त्यांनी 49.5 षटकात सर्वबाद 284 धावा केल्या.

अफगाणिस्तानकडून रेहमनुल्लाह गुरबाजने सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. तसेच इक्रम अलीखिलने 58 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून आदिल राशिदने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच मार्क वूडने 2 विकेट्स घेतल्या. याबरोबरच रिस टोपली, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जो रुट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT