Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

ICC ODI Batsmen Rankings: शुभमन गिलला बंपर फायदा, तर गब्बरला मोठा तोटा

ICC ODI Batsmen Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांची नवी क्रमवारी जाहीर केली आहे.

दैनिक गोमन्तक

ICC ODI Batsmen Rankings: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांची नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय सलामीवीर शुभमन गिल बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या ICC क्रमवारीत 38व्या स्थानावर पोहोचला आहे.

दरम्यान, 22 वर्षीय गिलने नुकत्याच संपलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली. हरारे येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याने अवघ्या 97 चेंडूत 130 धावा केल्या होत्या. याआधी त्याने दुसऱ्या वनडेत 33 आणि पहिल्या वनडेत नाबाद 82 धावा केल्या होत्या.

दुसरीकडे, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 744 रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर कायम आहे. झिम्बाब्वे दौऱ्यातून त्याला विश्रांती देण्यात आली होती. भारतीय कर्णधार रोहित शर्माही सहाव्या स्थानावर कायम आहे. झिम्बाब्वे दौऱ्यातूनही त्याला विश्रांती देण्यात आली होती. झिम्बाब्वेविरुद्धच्या (Zimbabwe) तीन सामन्यांत 154 धावा केल्या असूनही अनुभवी सलामीवीर शिखर धवनची 12 व्या स्थानावर घसरण झाली आहे. पहिल्या आणि तिसऱ्या वनडेत त्याने अर्धशतके झळकावली होती. पाकिस्तानचा (Pakistan) कर्णधार बाबर आझम या क्रमवारीत 891 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा रसी व्हॅन डर डुसेन आहे ज्याचे 789 रेटिंग गुण आहेत.

एकदिवसीय क्रमवारीतील शीर्ष 10 फलंदाज

1- बाबर आझम, 2- रासी व्हॅन डर डुसेन, 3- क्विंटन डी कॉक, 4- इमाम-उल-हक, 5- विराट कोहली, 6- रोहित शर्मा, 7- डेव्हिड वॉर्नर, 8- जॉनी बेअरस्टो, 9- रॉस टेलर , 10- आरोन फिंच.

दुसरीकडे, गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पहिल्या क्रमांकावर आहे, तर बांगलादेशचा शाकिब अल हसन अष्टपैलूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत जोश हेझलवूड दुसऱ्या, मुजीब उर रहमान तिसऱ्या, जसप्रीत बुमराह चौथ्या आणि शाहीन आफ्रिदी पाचव्या क्रमांकावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT