Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India: 'प्लेअर ऑफ द मंथ' साठी या दोन खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा, ICC घेणार अंतिम निर्णय

ICC Men's Player Of The Month: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी क्रिकेटपटूंची नामांकन केले आहे.

Manish Jadhav

ICC Men's Player Of The Month: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी क्रिकेटपटूंचे नामांकन केले आहे. विशेष बाब म्हणजे, जानेवारी महिन्यासाठी नामांकित तीन पुरुष खेळाडूंपैकी 2 भारतीय आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) लवकरच प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार जाहीर करणार आहे. या पुरस्कारासाठी टीम इंडियाच्या दोन खेळाडूंमध्ये जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

टीम इंडियाच्या या दोन खेळाडूंमध्ये स्पर्धा

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि सलामीवीर शुभमन गिल यांचे ICC पुरुष खेळाडूंच्या मंथ पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे हा देखील या पुरस्काराच्या शर्यतीतील तिसरा खेळाडू आहे, ज्याने या वर्षी आतापर्यंत वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये तीन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत.

शुभमन गिल सर्वात मोठा दावेदार

शुभमन गिलने गेल्या महिन्यात व्हाइट चेंडूच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली तर जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजने नवीन चेंडूसह एकदिवसीय सामन्यांमध्ये शानदार गोलंदाजी केली. गिलने मुंबईत श्रीलंकेविरुद्ध पहिला T20 खेळला, ज्यात तो केवळ सात धावा करु शकला, परंतु तिसऱ्या सामन्यात त्याने 46 धावा केल्या.

यानंतर तीन एकदिवसीय सामन्यात 70, 21 आणि 116 धावा केल्या. हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 149 चेंडूत 208 धावा केल्या, तर दुसऱ्या बाजूकडून कोणताही फलंदाज 28 धावा पार करु शकला नाही.

वनडेमध्ये दुहेरी शतक झळकावणारा सर्वात तरुण

एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन गिल हा सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे. यानंतर पुढील दोन डावात 40 आणि नाबाद 112 धावा केल्या. त्याने 360 धावा केल्या, तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या सर्वोच्च धावसंख्येच्या विक्रमाशी बरोबरी केली.

दुसरीकडे, सिराजने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सात षटकांत 30 धावा देत दोन बळी घेतले. यानंतर त्याने पुढील दोन सामन्यांत अनुक्रमे तीन आणि चार विकेट घेतल्या. हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) त्याने चार विकेट घेतल्या आणि दुसऱ्या सामन्यात सहा षटकांत फक्त दहा धावा देऊन एक बळी घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 06 August 2025: तांत्रिक कामे किंवा इलेक्ट्रॉनिक बाबतीत दक्षता घ्या, आरोग्याकडे दुर्लक्ष नको

Goa Fake Wedding Party: ना सासरचं टेन्शन, ना खर्चाची चिंता! गोव्यात 'फेक वेडिंग' इव्हेंटनं तरूणांना दिला लग्नसोहळ्याचा अनुभव

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत निसर्ग कोपला, ढगफुटीमुळे घरं गेली वाहून; कित्येकजण बेपत्ता

कॅसिनोंमध्ये बेकायदा लाइव्ह गेमिंग सुरूच; पोस्टाच्या स्कॅमनंतर सरदेसाईंचे आणखी एक स्टिंग ऑपरेशन, शेअर केला VIDEO

Team India: टीम इंडियावर संकटाचे ढग! रोहित-विराट एकदिवसीय विश्वचषक खेळणार नाही? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT