Ruturaj Gaikwad Dainik Gomantak
क्रीडा

ICC T20 क्रमवारीत मोठी उलथापालथ, ऋतुराज गायकवाडचे बल्ले-बल्ले!

ICC Latest Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने नवीन ODI आणि T20 क्रमवारी (ICC odi Rankings) जाहीर केली आहे.

Manish Jadhav

ICC Latest Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने नवीन ODI आणि T20 क्रमवारी (ICC ODI Rankings) जाहीर केली आहे. या वनडे क्रमवारीत शुभमन गिलला मोठा फायदा झाला आहे.

त्याचबरोबर युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने 143 अंकाची झेप घेतली आहे. ऋतुराज गायकवाड सध्या आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणार्‍या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत टीम इंडियाचा भाग आहे. या मालिकेत त्याने आतापर्यंत कमालीची कामगिरी केली आहे.

ऋतुराजने 143 अंकाची झेप घेतली

दरम्यान, भारताचा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ICC T20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडने ताज्या क्रमवारीत 143 अंकांनी झेप घेत टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत 87 व्या स्थानावर पोहोचला आहे.

ऋतुराजने आयर्लंडविरुद्धच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात 16 चेंडूत नाबाद 19 तर ​​दुसऱ्या सामन्यात 43 चेंडूत 58 धावा केल्या. या शानदार खेळीमुळेच त्याला आयसीसी क्रमवारीत फायदा झाला आहे.

एकदिवसीय क्रमवारीत शुभमन गिलचा दबदबा

दुसरीकडे, भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल याने एकदिवसीय क्रमवारीत प्रगती केली आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गिलशिवाय विराट कोहलीचाही टॉप 10 मध्ये समावेश आहे. कोहली 9 व्या क्रमांकावर आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा बाबर आझम अव्वल स्थानावर आहे. बाबरचे 880 गुण आहेत. तर शुभमनचे 743 गुण आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमधील गोलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोलायचे झाल्यास, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांचा टॉप 10 मध्ये समावेश आहे. सिराज पाचव्या क्रमांकावर आहे. कुलदीप दहाव्या क्रमांकावर आहे.

भारतीय संघ सांघिक क्रमवारीत चमकला

टीम इंडिया (Team India) 264 रेटिंगसह T20 टीम रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर वनडे संघ क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला 113 रेटिंग मिळाले आहे. वनडेमध्ये ऑस्ट्रेलिया 118 रेटिंगसह अव्वल आणि पाकिस्तान 116 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT